विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

विद्यार्थी पोहोचले पण परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक, प्रश्नपत्रिकाच नाहीत!

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर १० ची वेळ देण्यात आलेली असताना परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक आणि प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकच आले नसल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. नाशिकमध्ये देखील परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडालेला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा एकदा सावळा गोंधळ झाल्याचे चित्र आहे.

पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या आहेत. तर, काही जणांना प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाहीत. आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी पोहोचलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सरकार, आरोग्य विभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. सिंधुदुर्ग, बीड मधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. विद्याऱ्यांनी तीन- तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन या प्रकाराची दखल घ्यायला हवी असेही त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

बनावट वेबसाईटच्या आधारे तुळजाभवानी भक्तांची लूट!

इटलीच्या दौऱ्यात पुन्हा मोदी-बायडेन भेट

मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!

ICC Men’s T20 WC: आज कोणाला ‘मौका’?

नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परीक्षा केंद्रावर देखील गोंधळ पाहायला मिळाला. पेपर प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेवर विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विद्यार्थी संख्येपेक्षा कमी प्रमाणात प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्याचा आणि योग्य काळजी न घेतल्याचा दावा देखील विद्यार्थ्यांनी केला.

परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांची निवड करताना मोठा भ्रष्टाचार झाला आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपन्या ब्लॅक लिस्टमध्ये होत्या. कंपन्या ब्लॅक लिस्ट असून त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला असू शकतो, असे भाजप नेते सुधीर मुनंगटीवार म्हणाले. यापूर्वीही परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची वेळ आली होती.

Exit mobile version