कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर तसेच महाराष्ट्रातील गड किल्ले अशा महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळ आणि समृद्ध वारासंघाची ओळख जगभरात पोहचविणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे दालन सध्या जगभरातील आकर्षण बनले आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ओटीएम प्रदर्शनी मध्ये असलेल्या या दालनाला भारतासह जगभरातील पर्यटक आणि पर्यटन संबंधित सेवा देणाऱ्या कंपन्यांनाचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, पर्यटन संचालनालयाचे कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे, पर्यटन डॉ. बी.आर. पाटील, संचालक, पर्यटन संचालनालय यांनी महाराष्ट्रातील कंपन्यांचे प्रमुख प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय पाहुणे आणि पर्यटन भागधारकांच्या उपस्थितीत प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन केले.
यावेळी जयस्वाल म्हणाले की, या प्रदर्शनीमध्ये देशातील प्रत्येक राज्यातील पर्यटन क्षेत्रातील ट्रॅव्हल एजन्सी, रिसॉर्ट, विविध पर्यटन संस्थांची माहिती असलेले माहितीपूर्ण स्टॉल आहेत. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी इतर राज्यातील पर्यटन क्षेत्रातील विविध उद्योजकांशी चर्चा करता येईल. पर्यटन क्षेत्रात इतर राज्यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम संवादातून समजतील, इतर राज्यांच्या पर्यटन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन राज्यातील पर्यटन वाढीसाठी त्याचा नक्कीच लाभ होईल.
हेही वाचा..
पाच वर्षांत देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म!
ओवैसींकडून लोकसभेत ‘बाबरी मशीद जिंदाबाद’चे नारे
खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकाऱ्याच्या घरावर गोळीबार
हल्द्वानी हिंसाचार; समाजकंटकांना पेट्रोल बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान
राज्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजकांना ‘ओटीएम’ प्रदर्शनीच्या माध्यमातून स्थानिक पर्यटनाची माहिती देशपातळीवर नेता येईल. “कोकण, मुंबई, लोणावळा, महाबळेश्वर, नागपूर, ताडोबा, शिर्डी, छत्रपती संभाजी नगर आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या कंपन्यांसह राज्यातील प्रादेशिक वैविध्य उत्कृष्टपणे पॅव्हेलियनमध्ये प्रदर्शित केले जाईल.” असे जयश्री भोज, आयएएस मानद प्रधान सचिव, पर्यटन यांनी यावेळी सांगितले. कॉन्क्लेव्ह, रोड शो आणि ट्रेड मेळावे अशा कार्यक्रमांची मालिका करण्यावर महाराष्ट्र टुरिझमचा भर आहे. या प्रक्रियेत, दूरसंचार विभाग देशभरातील विविध प्रमुख पर्यटन व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होत आहे”, अशी माहिती दिली.