महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुंबई व परिसरातील सागरी प्रदूषण या विषयावरील एका जनजागृतीपर मराठी माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले. विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन या संस्थेच्या प्रोजेक्ट ब्लू अंतर्गत या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या वेळी बोलताना समुद्र आणि नद्यांची स्वच्छता अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
जगभर सध्या वाढते जल प्रदूषण हा चिंतेचा विषय ठरलेला आहे. पृथ्वीचा जवळपास ७०% भाग हा समुद्राने व्यापलेला आहे. अशात नदी आणि सागरात होणारे प्रदूषण रोखणे हे गरजेचे आहे. याच विचारातून विवेकानंद युथ कनेक्ट या संस्थेच्या प्रोजेक्ट ब्लू अंतरंगात एका माहितीपटाच्या निर्मिती करण्यात आली आहे. ३१ मे रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या माहितीपटाच्या अनावरण करण्यात आले. एका ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून हा अनावरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला परमार्थ निकेतनचे स्वामी चिदानंद सरस्वती, आचार्य लोकेश मुनी, रामकृष्ण मिशन बेलूर मठ येथील स्वामी विद्यानाथानंद, भजन गायक अनुप जलोटा व विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक डॉ राजेश सर्वज्ञ उपस्थित होते.
हे ही वाचा:
अभिनेत्री सौम्या टंडनचेही बनावट ओळखपत्र व्हायरल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भजनसम्राट अनुप जलोटा यांनी लोकप्रिय भजन गाऊन केली. त्यानंतर मुंबई महानगर समुद्र प्रदूषण या विषयावर परिसंवादाचे संचालन झी 24 तास या वृत्तवाहिनीचे मूख्य संपादक निलेश खरे यांनी केले. या परिसंवादात मुंबई शहरातील प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते. ग्यामन इंडियाचे अभिजित राजन , प्रियदर्शनी ऍकॅडमीचे नानिक रुपानी, प्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू , सोनी पीकचर्स फिल्म्स इंडियाचे विवेक कृष्णानी, ऑस्कर अकॅडमी सदस्य उज्वल निरगुडकर, मुंबई सस्टेनिबिलिटी सेंटर चे ऋषी अगरवाल सहभागी झाले होते. या सर्व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तन्मय चक्रवर्ती यांनी केले.