28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषआता रेल्वे फाटक ओलांडण्याची गरज नाही; १०० उड्डाणपूल बांधले जाणार

आता रेल्वे फाटक ओलांडण्याची गरज नाही; १०० उड्डाणपूल बांधले जाणार

रुळ ओलांडताना होणारे अपघात शून्यावर आणण्यासाठी योजना

Google News Follow

Related

रेल्वेने प्रवास करताना रेल्वे फाटक अडचणीचे ठरतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी रेल्वे फाटक असून त्याचा उपयोग रूळ ओलांडण्यासाठी केला जातो. रूळ ओलांडताना अनेकदा अपघात होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या अशा घटनांमुळे गाडयांना देखील गंतव्यठिकाणी पोहचण्यास विलंब होतो. पण आता प्रवासात आता रेल्वे फाटक अडथळा ठरणार नाही. महारेलच्या माध्यमातून येत्या वर्षभरात राज्यात शंभर रेल्वे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. येत्या पाच वर्षांत राज्यातील रेल्वे प्रवास फाटकमुक्त होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यातील बसस्थानकेही महारेलच्या माध्यमातून विमानतळांप्रमाणे बांधून अद्ययावत करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात नागपूर बसस्थानकापासून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. विदर्भातील रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दूरस्थ सहभाग घेतला.

रेल्वे फाटकांवर अपघात कमी व्हावेत, वाहतूक कोंडी होऊ नये, सुरळीत व त्रासमुक्त प्रवास व्हावा. त्यासाठी येत्या वर्षभरात महाराष्ट्रात रेल्वे वाहतूक सुलभ करण्यासाठी १०० उड्डाणपूल बांधले जात आहेत. येत्या पाच वर्षांत संपूर्ण राज्यातील रेल्वे फाटक हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजनी येथे १९२७ मध्ये बांधण्यात आलेला ब्रिटीशकालीन रेल्वे पूल आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. येथे अवजड वाहतूक बंद करण्यात आली. त्यासाठी येथे नवीन पुलाची गरज होती. या पुलाचे आज भूमिपूजन करण्यात आले. पहिल्या टप्प्याचे बांधकाम येत्या १४ महिन्यांत पूर्ण होईल.

हे ही वाचा:

उमेश पाल हत्याकांडात बॉम्बफेक करणारा गुड्डू मुस्लिमला नाशिकमधून घेतले ताब्यात

गुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन

ब्रिटनमधील जगदंबा तलवार, वाघनखे शिवराज्याभिषेकाला भारतात येतील?

दुहेरी हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू

अजनीमध्ये सहा पदरी पूल बांधणार

अजनीमध्ये सहा पदरी बांधण्यात येणार आहे. सध्याचा पूल काही दिवस असाच राहणार आहे. तीन पदरी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर जुना पूल पाडून उर्वरित तीन पदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या पुलाची लांबी २२० मीटर आणि रुंदी ३८ मीटर आहे. त्याची अंदाजे किंमत ३३२ कोटी रुपये आहे. या पुलामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा