महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

महाराष्ट्रातही होणार मोफत लसीकरण

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सारख्या सरकारांचा कित्ता गिरवत महाराष्ट्रातील ठाकरे सरकारनेही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. १ मे पासून राज्यात सुरु होणारे १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण हे निःशुल्क असणार आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मालिक यांनी या संदर्भातील माहिती माध्यमांना दिली.

देशभरात सध्या एकीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. तर दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. देशात सध्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि लसीकरण अधीक जलद गतीने होण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. देशात आता परदेशी लसींनाही परवानगी दिली जाणार आहे. तर १ मे पासून देशातील सर्वच प्रौढ नागरिक अर्थात १८ वर्षांवरील नागरिक हे लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. अशातच आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण निःशुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

कोविशील्डनंतर कोवॅक्सीनचीही किंमत जाहीर

कठीण समय येता रशिया कामास येतो?

अशातच योगी आदित्यनाथ आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेतला. त्याच यादीत आता महाराष्ट्राचाही समावेश झाला आहे. महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी या संदर्भातील माहिती माध्यमांना दिली. राज्यातील मंत्री मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला असल्याचे मलिक यांनी सांगितले आहे. यासाठी जागतिक निविदा काढणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

Exit mobile version