दुखवटा म्हणून राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी

दुखवटा म्हणून राज्यात सोमवारी सार्वजनिक सुट्टी

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज रविवार, ६ फेब्रुवारी रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ (सन १९८१चा अधिनियम २६) च्या कलम २५ अंतर्गत महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.”

पश्चिम बंगाल राज्य लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करण्यासाठी सोमवार ७ फेब्रूवारी रोजी राज्यात अर्धा दिवस सुट्टी पाळणार असल्याचे मुखमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.

हे ही वाचा:

तीन पाकिस्तानी घुसखोर ठार; १८० कोटींचे हेरॉईन जप्त

भारतीय क्रिकेट संघाने लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

लतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करत!

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

आपल्या अलौकीक आवाजाने फक्त भारतालाच नव्हे तर जगाला मोहून टाकणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसेच या दोन दिवसात देशात कोणतेही सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.

Exit mobile version