बिना परीक्षा मॅट्रिक पास

बिना परीक्षा मॅट्रिक पास

राज्यातील दहावीच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मंगळवारी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील दहावीचे विद्यार्थी बिना परीक्षा पास होणार आहेत. या आधी राज्यातील नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करत त्यांना पुढील वर्गात पाठवण्यात आले होते. तसाच निर्णय आता दहावीच्या विदयार्थ्यांबाबत घेण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सातत्याने होत असलेला कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट पाहता राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले होते. पण सरकारने लावलेल्या कडक निर्बंधांचा कोणताही परिणाम झाला नाही. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या मानाने राज्यातील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर या साऱ्याच गोष्टींची कमतरता जाणवत आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक मंगळवारी दुपारी पार पडली. या बैठकीत राज्यातील एकूणच कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असा सूर सगळ्याच मंत्र्यांचा दिसून आला. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लॉकडाऊन एकूण पंधरा दिवसांसाठी असणार आहे अशी माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

राज्यांनी लक्षात ठेवावे, लॉकडाउन अंतिम पर्याय!

महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

तृणमुलच्या नेत्याचा धमकावतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण

याच बैठकीत राज्यातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. गेली वर्षभर कोरोनाच्या कारणामुळे दहावीचे वर्ग हे ऑनलाईन भरले. अशा परिस्थितीत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण होणे शक्य झाले नाही. तसेच राज्यातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती या सर्व बाबी लक्षात घेता राज्य सरकारमार्फत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या दहावीच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा मात्र होणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नक्की कशाप्रकारे होणार आहे या बाबतीत अजूनही स्पष्टता राज्य सरकारतर्फे करण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे आता राज्य सरकार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना काय निकष लावणार याकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version