बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेबरोबर ‘मिलाप’ या योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला.

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

Close-up Of Jobs Text On Wooden Blocks Over Keyboard In Office

राज्य शासन-टाटा सामाजिक संस्थेचा करार

कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य शासनाने राज्यातील कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी आणि पुढील शिक्षणाची हमी देणारी येजना सुरू केली आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून ही योजना राबिवण्यात येणार आहे.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेबरोबर ‘मिलाप’ या योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला. या वर्षात किमान १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या आधारावर नोकरी करता करता वेगवेगळ्या क्षेत्रातील शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून संबंधित विषयातील पदविका आणि पदवी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने यापूर्वी सुरू केलेल्या ‘मिलाप’ या कार्यक्रमाद्वारे बारावीत गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एकाच वेळी उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एचसीएल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यासाठी आतापर्यंत ३४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या योजनेंतर्गत चालू वर्षांत २५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण व नोकरीची हमी दिली जाणार आहे, अशी माहिती समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना रिटेल मॅनेजमेंट,  अ‍ॅग्रीकल्चर, इलेक्ट्रॉनिक्स, चाईल्ड केअर, ऑटोमोटिव्ह, मिडिया, लाईफ सायन्स, टुरिझम अ‍ॅंड हॉस्पिटॅलिटी, आयटी इत्यादी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेताना नोकरीची संधी दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

‘मालाडची स्मशानभूमी तोडलीत; मढचे स्टुडिओ का तोडले नाहीत?’

सामंजस्य करारावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, टाटा सामाजिक संस्थेच्या वतीने स्कूल ऑफ व्होकेशनल एज्युकेशनच्या प्रमुख प्राचार्य मधुश्री शेखर, तानिया शॉ, विनीता कौशल आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version