केंद्राकडून महाराष्ट्राला ऑक्टोबर महिन्यासाठी २.२ करोड लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. दिवसाला १५ लाख डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे , अशी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
आठवड्याभरात चांगल्या संख्येने लसीकरण होऊ शकेल इतक्या नव्या लसींचे डोस देण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ‘२.५ लाख कोव्हिशिल्ड आणि ८० हजार कोवॅक्सीन लसीचे डोस मिळाले असून आठवड्यातील पहिल्या तीन ते चार दिवसांमध्ये दिवसाला एक लाख मात्रा देता येतील’, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हे ही वाचा:
आर्यन खानसह तिघांना एनसीबीने केली अटक!
आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?
‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’
राज्याकडून तीन कोटी मात्रांची मागणी केंद्राकडे करण्यात आली होती. आतापर्यंत राज्यात ८.२७ करोड नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ५.८१ करोड लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर २.४६ करोड लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. राज्यातील जवळपास ३० टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजेच २९.५ लाख लसीचे डोस देण्यात आले. त्यातील २० लाख लसीचे डोस हे सार्वजनिक लसीकरण केंद्रावर देण्यात आले. ऑक्टोबरमध्ये ही कामगिरी अजून चांगली होणार अशी अपेक्षा असल्याचे काकाणी यांनी सांगितले. राज्याने सप्टेंबरच्या मध्यात दोन करोड लसीकरणाचा टप्पा गाठला. सप्टेंबरच्या सुरुवातीला एका दिवसात १५ लाख डोस देण्याचा विक्रमही केला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी जास्त लस पुरवठा केल्याबद्दल केंद्राचे आभारही मानले असेही त्यांनी सांगितले.