रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

रोज होतात इतकी कोटी अंडी फस्त

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे .. याचे तंतोतंत पालन केले जात आहे. महाराष्ट्रातील अंडे प्रेमी रोज जवळपास सव्वा दोन कोटींपेक्षा जास्त अंडी फस्त करतात. सध्या महाराष्ट्रात थंडीचा कडक वाढल्यामुळे अंड्यांची मागणी जास्त वाढली आहे. मागणी वाढल्यामुळे अंड्याच्या किंमती वाढल्या आहेत. पण त्याच वेळी अंड्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात तब्बल १ कोटी अंड्याचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपासून अंड्यांचा तुटवडा आहे. यामागे कोणताही आजार किंवा अन्य कारण नसून महाराष्ट्रात वाढलेली थंडी हे कारण मानले जात आहे. बरं, ही टंचाई छोटी गोष्ट नसून राज्यात दररोज सुमारे एक कोटी अंड्यांचा तुटवडा असल्याचा दावा केला जात आहे.

दिवसेंदिवस अंड्यांच्या तीव्र टंचाईमुळे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने अंडी उत्पादन वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. अंड्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी विभागाने अंड्यांचे उत्पादन वाढविण्याचा आराखडा तयार केला आहे. सध्या राज्यात दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा आहे. राज्यात दररोज २.२५ कोटींहून अधिक अंडी विकली जातात. मात्र सध्या उत्पादन कमी असल्याने विक्रीत घट झाली आहे.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

समीर मयेकर, निकाळजे यांच्या विज्ञान प्रकल्पाचे यश

दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

अंडी उत्पादन वाढवण्यासाठी, राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक जिल्ह्याच्या कुक्कुटपालनासाठी १,००० पिंजरे,५० पांढऱ्या लेगहॉर्न कोंबडी २१,००० रुपये अनुदानित दराने देण्याची योजना आखली आहे. राज्यातील अंड्यांचा तुटवडा पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना सुरळीत अंड्यांचा पुरवठा व्हावा यासाठी  कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी केली जात आहेत.

Exit mobile version