महाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत

महाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत

४० वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र व कोल्हापूरच्या मुले व मुलींनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. कोल्हापूरला राष्ट्रीय स्पर्धेत थेट प्रवेश असतो.

येथील बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत  गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या शेवटच्या साखळी सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी मणीपुरला १८-५ एक डाव १३ गुणांनी नमविले. यात सौरभ अहिर (२.४० मिनिटे व २ गुण),धीरज भावे (२.०० मिनिटे व २ गुण) तर किरण वसावे (२.४० नाबाद व ३ गुण) असा अष्टपैलू खेळ केला. मनिपुरकडून ख्रिस्तोफरने १.१० मिनिटे पळती करीत लढत दिली.

मुलींनी तेलंगणाचा २३-३ असा एक डाव राखून धुव्वा उडविला. दिपालीने आपल्या धारदार आक्रमणात सहा  गडी टिपले. गौरी शिंदे हीने नाबाद तीन तर सरिता दिव्या व जानव्ही पेठे यांनी प्रत्येकी २.३० पळती केली.

हे ही वाचा:

देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल

रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात

रतन टाटा यांनी का केले नरेंद्र मोदींचे कौतुक?

शुक्रवारी सकाळी कोल्हापूरच्या मुलांनी शेवटच्या साखळी सामन्यात मध्यभारतचा ३०-१३असा १७ गुणांनी पराभव केला. त्यांच्या सुशांत हजारे याने आक्रमणात ९ गडी बाद करताना १.०० व १.४०मिनिटे पळती करीत अष्टपैलू खेळ केला.

मुलींच्या गटात त्यांनी राजस्थानवर १०-०७ असा एक डावाने विजय मिळविला. स्वातीने ४.४० व २.१० अशी संरक्षणाची खेळी केली.

Exit mobile version