आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!

रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदी निवड!

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे.पोलीस महासंचालक पदासाठीच्या ज्येष्ठता यादीत रश्मी शुक्ला यांचे नाव आघाडीवर आहे.तसेच शुक्ला यांना मुंबईचे पोलिस आयुक्त करण्यात येणार असल्याची चर्चा होती.मात्र, अखेर पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांच्या नावाची मोहोर लागली. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत.राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची बैठक शुक्रवार २९ डिसेंबर रोजी झाली. यावेळी त्यांनी महासंचालकपदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवली होती. यामध्ये पहिले नाव होते रश्मी शुक्ला यांचे होते.यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागणार होता.अखेर ४ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीबाबत आदेश जारी केले आहेत.रश्मी शुक्ला यांना ६ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, त्यानंतर राज्य सरकार त्यांना वाढवू शकते.

हे ही वाचा:

चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!

२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!

न्यायनिवाडा करताना नेवाडात आरोपीची न्यायाधीशांवर उडी!

 पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो

रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपैकी एक. त्यांनी सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्र प्रमुख म्हणूनही काम केले. याशिवाय त्यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात नाव होतं चर्चेत
राज्यात फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लाचे नाव चर्चेत होते . फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली होती. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप करण्यात आले होते.त्यांची चौकशीही करण्यात आली होती. मंत्री आणि नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.त्यावेळी रश्मी शुक्ला राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या.त्यावेळी त्यांच्यावर संजय राऊत, नाना पटोले सहित महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होता.

 

Exit mobile version