24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमहाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन: कथा अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची!

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन: कथा अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची!

१ मे हा महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो

Google News Follow

Related

१ मे हा महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. हे दोन्ही दिवस साजरा करण्यामागे इतिहास असून या दोन्ही दिवसांच्या मागचा इतिहास जरी वेगळा असला तरी एक साम्य देखील आहे. या दोन्ही घटनांमागे इतिहासाची कथा आहे ती अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करण्याची, हक्कासाठी संघर्ष उभारण्याची आणि प्रसंगी बलिदान दिल्याची.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. यानंतर भाषेच्या आधारावर राज्याची स्थापना करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. दरम्यान मराठी भाषिक आणि गुजराती भाषिक वेगवेगळ्या राज्याची मागणी करू लागले. शांततेत या राज्यांची निर्मिती होईल असे वाटत असतानाच मुंबई कोणाची यावरून वाद पेटला. या काळात मुंबईतील काही गुजरात धार्जिण्या नेत्यांनी मुंबई शहर गुजरात राज्याला जोडण्याचा प्रयत्न केला आणि इकडे मुंबईसह महाराष्ट्राची निर्मितीची मागणी जोर धरु लागली. त्यावेळी मराठी भाषा बोलणारे लोक गुजरातमधील डांग आणि उंबरगाव भागातही होते, तसे ते कर्नाटकाच्या सीमेवरही होते. त्यामुळे बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी आणि गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीनं उचल खाल्ली आणि संयुक्त महाराष्ट्राचा एक मोठा लढा उभा राहिला.

गुजरात धार्जिण्या नेत्यांनी केंद्रात ताकद लावल्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. याला मराठी माणसानं प्रखर विरोध कराला सुरूवात केली. २१ नोव्हेंबर १९५६रोजी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचं वातावरण होतं. आंदोलक मुंबई महाराष्ट्रातच राहिली पाहिजे यासाठी मागणी करत होते. याचा परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येणार होता. त्यावेळी मुंबईच्या फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदीचा आदेश जारी करण्यात आला होता. परंतु, सरकराच्या या जमावबंदीला झुगारून मुंबईकर फ्लोरा फाऊंटनच्या चौकात सत्याग्रह करण्यासाठी ठाण मांडून बसले होते. त्यांना उधळून लावण्यासाठी सुरुवातीला लाठीमार करण्यात आला. परंतु आंदोलक लाठ्या खाऊनही जागा सोडत नाहीत असं दिसल्यावर अखेर पोलिसांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला.

मुंबई राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश दिला होता. शांततेच्या मार्गानं सुरू असलेल्या या सत्याग्रहीवर पोलिसांनी बेछूट गोळीबार सुरू केला. मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचा चिखल झाला. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या या लढ्यात १०६ आंदोलकांना आपल्या जीवाचं बलीदान द्याव लागलं. अखेर या आंदोलनाला यश आलं आणि १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तरी संयुक्त महाराष्ट्र होण्याचं स्वप्न काही प्रमाणात अपुरचं राहिलं. बेळगाव, कारवार, निपाणी, हुबळी, धारवाड, बिदर भालकी हा कर्नाकातील मराठी भाषिक भूभाग अद्यापही महाराष्ट्रात सामील होऊ शकला नाही.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचा षटकार!

कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने रेवण्णावर का कारवाई केली नाही ?

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या भाचीने केली ‘व्होट जिहाद’ ची घोषणा

शरद पवार कृषिमंत्री असताना काय केले?

१ मे हा दिवस जगभर कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात जगभरातील कामगार चांगल्या कामाच्या परिस्थिती आणि अधिकारांसाठी एकत्र येऊ लागले. १ मे १८८६ रोजी कामगार आठ तासांच्या कामाच्या दिवसाच्या मागणीसाठी शिकागोतील कामगार रस्त्यावर उतरले. हेमार्केट स्क्वेअरमध्ये श्रमिक रॅलीदरम्यान बॉम्बचा स्फोट झाल्यावर शांततापूर्ण निदर्शन सुरू असताना त्याला हिंसक वळण मिळालं. परिणामी पोलीस अधिकारी आणि आंदोलक दोघेही जखमी झाले. कामगारांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचे प्रतीक असलेल्या या आंदोलनानं जगभरातील कामगार चळवळीला चालना दिली. पुढे भांडवलदार वर्गाकडून नफ्यासाठी कामगारांचे होणारे शोषण, कामाचे निश्चित तास नसणे, आठवड्याची सुट्टी, किमान वेतन कायदे, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियम यासारख्या अन्याय कारक गोष्टींवर कामगार वर्गाची एकी वाढत गेली. १८८९ मध्ये पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये कामगार आंदोलनात वीर मरण आलेल्या शहीदांचा सन्मान करण्यासाठी आणि सर्वत्र कामगारांशी एकता प्रदर्शित करण्यासाठी १ मे हा अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय कामगार दिन घोषित केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा