टाईम्स स्क्वेअरवर झळकले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे बॅनर

टाईम्स स्क्वेअरवर झळकले मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे बॅनर

शिवसेनेतील बंडखोरी आणि महाविकास आघाडी कोसळल्याने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात तसेच देशात एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. मात्र, त्यांचे चाहते राज्यात आणि देशातच नाही तर परदेशातही आहेत. असाच अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ९ फेब्रुवारी रोजी आपला ५९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमेरिकेतील जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये काही तरुणांनी एकनाथ शिंदे यांचे बॅनर लावून वाढदिवस साजरा केला. ही छायाचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

ठाण्यातील युवासेना कोअर कमिटीचे सदस्य नितीन लांडगे यांच्या काही मित्रांनी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस टाइम्स स्क्वेअरवर साजरा करण्याचे ठरवले. यात अभिनव जैन, राजीव पंड्या, रुचिता जैन या तरुणांचा समावेश आहे. हे सर्वजण कामानिमित्त न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी टाईम्स स्क्वेअरवर जाऊन एकनाथ शिंदे यांचा केक कापून वाढदिवस साजरा केला.

हे ही वाचा:

बहुप्रतीक्षित डबल डेकर वातानुकूलित ई बस सेवा पुढील आठवड्यात सुरु

पीएफआयला २०४७ पर्यंत भारतात स्थापन करायचे होते इस्लामिक राज्य

उद्धव ठाकरेंसमोर त्यांचेच उपनेते वादाला पेटले

राष्ट्रवादीचे औरंगजेब प्रेम पुन्हा जागृत

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अल्पावधीतच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात राहणाऱ्या मराठी अमराठी माणसांच्या हृदयात एकनाथ शिंदे यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस न्यूयॉर्कमध्ये साजरा करण्याचे ठरवले. एवढेच नाही तर या तरुणांनी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर बनवून टाइम्स स्क्वेअर आणि ग्रँड सेंट्रलमध्ये प्रदर्शित केले. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खास भेटवस्तू देण्यासाठी हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचे तरुणांनी सांगितले.

Exit mobile version