30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

निर्यातीला चालना, धनगर समाजासाठी शक्तिप्रदत्त समिती, एअर इंडियाची इमारत ताब्यात घेणार

Google News Follow

Related

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून त्यामध्ये विविध ११ निर्णयांना मान्यता देण्यात आली आहे.धनगरांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवण्यात येणार आहेत.राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाच्या निर्यातीला वेग देण्यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर करण्यात आलं आहे.तसेच मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार येणार आहे.अशा विविध ११ निर्णयांना आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाचे धडाकेबाज ११ निर्णय

( इतर मागास बहुजन कल्याण)
* धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती.

( उद्योग विभाग)
* राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता

( जलसंपदा विभाग)
* मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

हे ही वाचा:

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

बरखास्त श्रीलंका क्रिकेट बोर्ड न्यायालयाकडून पुनर्स्थापित

भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल

( वैद्यकीय शिक्षण)
* अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार

( वस्त्रोद्योग विभाग)
* मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

( इतर मागास बहुजन कल्याण )
* गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार

( सहकार विभाग)
* विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा

( पर्यटन विभाग)
* मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार

( गृह विभाग)
* बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

( पशुसंवर्धन)

* महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार

( सार्वजनिक बांधकाम विभाग)
* नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा