तरुणीला गाडीने धडक देणारा आयएएस अधिकाऱ्याच्या मुलगा अश्वजित अटकेत!

आणखी दोन सहकाऱ्यांनाही घेतले ताब्यात

तरुणीला गाडीने धडक देणारा आयएएस अधिकाऱ्याच्या मुलगा अश्वजित अटकेत!

२६ वर्षीय प्रिया सिंह हिला मारहाण करून तिला गाडीने धडक दिल्याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा अश्वजित गायकवाड आणि त्याचे दोन सहकारी रोमिल पाटील आणि सागर शेडगे यांना रविवारी अटक केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून पथकाने या घटनेत वापरलेली लँड रोव्हर डिफेन्डर ही गाडी जप्त केली आहे. ११ डिसेंबर रोजी प्रिया सिंह गायकवाड याला भेटायला गेली होती. मात्र गायकवाड याने तिच्याशी विचित्र वर्तन केले. याचा तिने जाब विचारला असता त्याने तिला मारहाण केली. गळा दाबण्याचा प्रयत्न केला.

प्रिया सिंहने त्याला ढकलले असता, त्याने तिच्या हाताचा चावा घेतला, केस ओढले आणि त्याच्या मित्रांनी तिला जमिनीवर ढकलून दिले होते. ही सर्व घटना तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर नमूद केली होती. तसेच, ती तिचा फोन आणि तिची बॅग घेण्यासाठी त्याच्या गाडीच्या दिशेने गेली असता, अश्वजीतने त्याच्या ड्रायव्हरला गाडीने तिला धडक देण्यास सांगितले. तिच्या पायांवरून गाडी नेल्यानंतर त्या सर्व जणांनी घटनास्थळावरून पलायन केले, असा दावा तिने केला.

हे ही वाचा:

ठाकरेंनी अदानींचे विमान वापरले, पैसे नाही भरले!

विघ्नेश मुरकर युवा महोत्सव फोटोग्राफी स्पर्धेत पहिला

उत्तराखंडमधील पर्यटक आता हवेत उडणार!

सायबर फसवणूक प्रकरणी सरकारचे कडक धोरण, ५५ लाख सिम केले ब्लॉक!

‘माझा उजवा पाय मोडला आहे, मला शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यात रॉड घालावा लागला आहे. माझ्या संपूर्ण शरीरातून वेदना होत आहेत. माझे हात, माझी पाठ आणि माझ्या पोटाच्या भागाला जखमा झाल्या आहेत,’ असे प्रियाने सांगितले. ती आणि अश्वजित गेल्या साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंधात होते, असा दावा प्रियाने केला आहे.
प्रियाच्या तक्रारीनुसार, अश्वजीत गायकवाड आणि तिच्या दोन सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version