25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषचित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

चित्रिकरणासाठी निर्बंध उठले परंतु प्रश्नचिन्ह कायम

Google News Follow

Related

राज्यातील टाळेबंदीचा निर्णय सरकारने शिथिल करण्याची घोषणा केली. पाच टप्पे या टाळेबंदी शिथिल करण्यासाठी आखले. या सर्व नियमावलीमध्ये चित्रिकरणासाठी मात्र अजूनही खूप गोष्टी सुस्पष्ट होणे गरजेचे झालेले आहे. अनेक मालिकांचे शुटींग मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये होते. त्यामुळे एका जिल्ह्यामधून दुसरीकडे कलाकारांसह इतर अनेकांची येजा होत असते.

राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले, परंतु एकूणच पुन्हा एकदा गोंधळात पाडणारे निर्णय समोर आले आहेत. या एकूणच निर्णयामुळे सर्वच ठिकाणी गोंधळाचे वातावरण आता दिसून येत आहे. खासकरून मनोरंजन सृष्टीत गोंधळाचे वातावरण अधिक दिसत आहे.

हे ही वाचा:

सलग आठव्या महिन्यात जीएसटी महसूल १ लाख कोटींच्या पार

दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

खासदारकीवर दृष्टी, PR चा कोन

‘ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली’

टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीने आपला मोर्चा महाराष्ट्राबाहेर वळवला होता. आता राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु त्यामध्ये कुठेही सूसूत्रता नसल्यामुळे अनेक अडचणी समोर येताहेत. गट १ आणि २ असलेल्या विभागांना चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. हे असे असले तरी जिल्हाबंदी याहीक्षणी कायमच आहे. एकीकडे कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासह इतर सेटवरील घटकांसाठी राहण्याची व्यवस्था हे असे अनेक प्रश्न निर्मात्यांसमोर आजच्या क्षणाला उभे आहेत.

केवळ इतकेच नाही तर प्रवासी नियमांबाबतही सुस्पष्टता नसल्यामुळे सर्वच गोंधळाची परिस्थिती सेटवरही निर्माण होत आहे. एकूणच काय तर सरकारने निर्बंध उठवण्याची घोषणा तर केलीय. परंतु त्यामुळे उडणारा गोंधळ सरकारच्या लक्षात येत नाहीये.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा