पुण्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला आहे.पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.पालकमंत्री पदासाठी चंद्रकांतदादा पाटील आणि अजित पवार यांच्यात चढाओढ पाहायला मिळाली होती.
महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटत नव्हता अखेर अजित पवारांच्या नाराजीनंतर तिढा सुटला. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
पालकमंत्री पदासाठीची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर मनासारखा जिल्हा न मिळाल्यामुळे अजित पवार, दादा भुसे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली होती. पुण्याचे पालकमंत्रिपद जरी चंद्रकांत पाटील यांच्याकडे असले तरी अजित पवार सुपर पालकमंत्री असल्यासारखे वागताना दिसत होते.राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
हे ही वाचा:
सिक्कीममध्ये ढगफुटी; महापुरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता
इटलीमध्ये पर्यटकांची बस उलटून २१ ठार
मुंबईमधील स्विमिंग पूलमध्ये शिरली मगर
अजित पवारांनी गणेशोत्सवाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीच्या दर्शनाला जाण्याचं टाळले. तसेच मंगळवारी झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही देखील ते गैरहजर होते. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आणि अनेक महिन्यांपासून रखडलेला पालकमंत्री पदाचा तिढा सुटला आहे.
सुधारित १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार