मास्टर भारत श्री २०२१ किताबावर महाराष्ट्राचा झेंडा

मास्टर भारत श्री २०२१ किताबावर महाराष्ट्राचा झेंडा

इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन यांच्यातर्फे नॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सहाय्यक पोलिस निरिक्षक सुभाष पुजारी हे ‘भारत श्री २०२१’ या किताबाचे मानकरी ठरले. हा किताब जिंकणारे पुजारी हे देशातील पहिले पोलिस अधिकारी ठरले आहेत.

‘मास्टर भारत श्री’ २०२१ खेळताना सुभाष पुजारी यांनी ८० किलो वजनाच्या गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. हे महाराष्ट्र पोलिसांची शान वाढवणारे ठरले आहे. मालदीव येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पुजारी भारताचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा १ ते ७ सप्टेंबर या दरम्यान होणार आहे.

हे ही वाचा:

कारूळकर प्रतिष्ठानने राखला निलेश तेलगडे यांच्या कुटुंबियांना दिलेला शब्द

मुख्यमंत्र्यांनी नुसतेच धन्यवाद दिले, न्याय कधी देणार?

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

पोलिस दलात त्यांनी उत्तमोत्तम कामगिरी केली आहे. महामार्ग पोलिस विभागात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाव वरीष्ठांच्या आदेशाने वेगवेगळे उपक्रम राबवून वाहतूकीस शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच कोल्हापूरात पूर परिस्थिती निर्माण झाली असताना त्यांनी अनेक कोल्हापूरवासीयांना अन्नधान्याची मदत केली होती. त्याबरोबर कोरोनाकाळात देखील त्यांनी कोरोना प्रसार रोखण्यासाठी मोठे योगदान दिले.

त्यांच्या शरिरसौष्ठव क्षेत्रातील या यशाबद्दल भाजपा महाराष्ट्र तर्फे ट्वीट करून त्यांचे अभिनंदन केले आहे. या ट्वीटमध्ये महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडवण्याचा पराक्रम केला असल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version