स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई!

स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई!

देशात नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांचे दर्शन घडते. देवीच्या या नऊ रुपात शूर, निडर, पराक्रमी आणि सामर्थ्यशाली स्त्रीची ओळख दिसून येते. अशीचं एक सामर्थ्यशाली स्त्री म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोरल्या सुनबाई आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी येसूबाई भोसले.

महाराणी येसूबाई यांचा जन्म १६५८ साली शृंगारपूर येथे झाला. १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिण कोकण प्रदेशावर स्वारी केली. तेव्हा दाभोळ प्रांतातील रायरी शिरकाणचे सूर्यराव सुर्वे हे पळून गेले. पण त्याच्या चाकरीत असलेले पिलाजीराव शिर्के स्वराज्यात सामील झाले आणि याच पिलाजीराव शिर्के यांची मुलगी येसूबाई यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी सून म्हणून स्वीकारले. छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सूनबाई, छत्रपती संभाजी महाराजांची महाराणी आणि प्रजाजनांचे आदरस्थान, अशा महाराणी येसूबाईंचा जीवनसंघर्ष खडतर होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मराठा साम्राज्याची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांवर आली होती. मुघल, पोर्तुगीज, इंग्रज अशा परीकीय सत्तांचे वादळ मराठा साम्राज्यावर घोंगावत होते आणि याला निधड्या छातीने सामोरे जात होते छत्रपती शंभू महाराज. छत्रपती शंभूराजे सततचे युद्ध आणि डावपेचात मग्न असताना स्वराज्याची घडी कोण सांभाळणार हे मुख्य आव्हान होते. पण ती जबाबदारी पार पाडली शंभू राजेंच्या पत्नी महाराणी येसूबाई यांनी. ‘श्री सखी राज्ञी जयती’ या शिक्क्यासह येणारे आदेश, पत्र मराठी साम्राज्याला दिशा देत होते. शंभू राजेंच्या मृत्यूनंतर तब्बल ३० वर्षे औरांजेबाच्या कैदेत राहणाऱ्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांनी मराठे शाहीचा दरारा कायम ठेवला.

हे ही वाचा..

उत्तर लेबनॉनवर इस्रायलकडून झालेल्या हल्ल्यात हमासच्या प्रमुख नेत्यासह कुटुंबीय ठार

एससीओमध्ये भारत-पाकिस्तान चर्चा नाकारली

तिरुपती देवस्थानच्या प्रसादाबद्द्ल भाविकांकडून समाधान

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका चिमुकलीवर बलात्कार करून हत्या

महाराणी येसूबाईसाहेबांनी धैर्याने आणि कणखर वृत्तीने त्या खडतर जीवनाला तोंड दिले याची दखल इतिहासात आहेच. ४ जुलै १७१९ ला राजमाता येसूबाईसाहेब मुघलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या. मुघलांच्या कैदेत मृत्यू समोर असतानाही मराठा साम्राज्यावर आलेल्या सुल्तानी संकटांना थोपवत, थोरल्या शाहू महाराजांची काळजी घेत आपला दरारा कायम ठेवणाऱ्या अशा या स्त्री शक्तीला नमन!

Exit mobile version