गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!

बैठकीमध्ये डजनभर गावातील हजारो लोक सहभागी 

गाझियाबादमध्ये लघवी-थुंकीच्या कारनाम्यांविरोधात हिंदू संघटनांची महापंचायत, बहिष्काराची घोषणा!

गाझियाबादच्या लोणी भागातील तिला गावात रविवारी (२२ सप्टेंबर) पार पडलेल्या महापंचायतमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदू संघटनांनी सर्व समाजाला एकत्रित बोलवून पंचायत घेतली. या बैठकीत साधू-महाराजांसह डजनभर गावातील हजारो लोक सहभागी झाले होते. अन्न व पेयांमध्ये लघवी-थुंकी मिसळणाऱ्यांवर आर्थिक व सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहन या पंचायतीमध्ये करण्यात आले आहे. याबाबत लोकांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना उद्देशून स्थानिक आमदार आणि एसपी यांना निवेदनही दिले आहे.

पंचायतीला संबोधित करताना स्वामी दीपंकर महाराज म्हणाले की, जातीपाती बाजूला ठेवून हिंदू समाजाला संघटीत व्हावे लागेल. संपूर्ण समाजाला एकत्र येण्याची वेळ आली आहे. साध्वी डॉ.प्राची म्हणाल्या की, हिंदू समाजातील ३६ समुदायांना एकत्र यावे लागेल. त्या पुढे म्हणाल्या, इतर समाजातील लोक आपल्या बहिणी आणि मुलींना फसवण्यासाठी हिंदू नावे ठेवत आहेत, जर त्यांना हिंदू नावे इतकी आवडत असतील तर त्यांनी धर्म बदलून हिंदू धर्मात यावे, आम्ही त्यांना आपलेसे करून घेवू. लोणीतील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनीही पंचायतमध्ये उपस्थित लोकांना संबोधित केले. यावेळी सर्वांनी अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

हे ही वाचा : 

तर आम्ही मंदिरे जाळू !

मंत्रिमंडळ निर्णय; सरपंच- उपसरपंचांचे मानधन दुप्पट, ब्राह्मणांसाठी महामंडळ

आतिशी यांनी रिकामी ठेवली केजरीवालांची खुर्ची, भाजपाकडून टोमणा!

ठाणे म्युनिसिपल ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

दरम्यान, गाझियाबादच्या लोनी पोलीस स्टेशन हद्दीतील इंदिरापुरी चौकीत १५ सप्टेंबर रोजी एक मोठी घटना समोर आली होती. आमीर खान नावाचा ज्यूस विक्रेता ग्राहकांना ज्यूसमध्ये लघवी मिसळून प्यायला देत असल्याचे समोर आले होते. ज्यूस विक्रेत्याच्या कारण्याम्याची माहिती समजताच संतप्त लोकांनी आरोपी आमीर खान आणि एका सहकाऱ्याला बेदम मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. लोकांनी दुकानात प्रवेश करताच प्लास्टिकच्या कॅनमध्ये एक लिटर लघवी आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दुकानदार आमिर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली होती.

Exit mobile version