रघुवंशी समाजाचे महंत कनक बिहारी दासजी महाराज यांचे सोमवारी सकाळी आठ वाजता नरसिंगपूरजवळ झालेल्या अपघातात निधन झाले. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार उलटली.यामध्ये महंत कनक बिहारी दास हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
महाराजांचे शिष्य विश्राम रघुवंशी यांचेही निधन झाले. महाराज १० फेब्रुवारी २०२४ ला अयोध्येत ९ कुंडीय यज्ञ करणार होते. त्यासाठी ते विविध भागांचा दौरा करत होते. महंत छिंदवाड़ाकडे निघाले असतांना वाटेत हा अपघात झाला. त्यांच्या निधनामुळे छिंदवाडा येथे राहणाऱ्या त्यांच्या शेकडो भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.
या अपघातात महाराजांचे शिष्य विश्राम रघुवंशी यांचेही निधन झाले. चालक रूपलाल गंभीर जखमी झाला असून त्याला नरसिंगपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कनक महाराज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून छिंदवाड़ा कडे निघाले होते. बरमान-सगरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरून जात असतांना, सागरी गावाजवळ एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची एसयूव्ही दुभाजकाला धडकून उलटली.
महंत कनक बिहारी दासजी महाराज हे मूळचे विदिशा येथील रहिवासी आहेत. तो बराच काळ लोणीकला श्रीराम जानकी मंदिरात राहत होता. विदिशा, गुना आणि अयोध्येतील विविध धार्मिक कार्यक्रमांना ते नियमितपणे हजेरी लावत असत. महाराजांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे हजारो शिष्य छिंदवाड्याला निघाले आहेत. महंतांचा आश्रम मध्य प्रदेशच्या छिंदवाड़ा जिल्ह्यातील नोनीमध्ये होता..पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. मध्यप्रदेशमधील बड्या राजकीय नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
सीरियात मशरूम पिकवणाऱ्या ३१ शेतकऱ्यांची हत्या
ठाकरे गटाची याचिका फेटाळली; पालिकेत २२७ प्रभागच
बीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड
सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नाशिकच्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास
राम मंदिरासाठी दिली होती १. ११ कोटींची देणगी
महंत कनक बिहारी दासजी महाराज यांनी २०२१ मध्ये श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी १.११ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला होता . ही रक्कम रघुवंशी समाजाच्या भक्तांकडून गोळा करून मरियदा पुरुषोत्तम भगवान श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देण्यात आली होती.