महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य दूध विक्री करणारी संस्था म्हणून ‘महानंद डेयरी’ ओळखली जायची. मात्र आता दूध उत्पादने कमी झाल्याने दुधाचे वितरण सुद्धा कमी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकरी दूध महासंघ मर्यादीत दूध संघाची ‘शिखर संस्था’ असलेली महानंद डेअरी आता केवळ नावाची संस्था राहिली आहे. तसेच सभासद संघाकडून दररोज ८ लाख लीटर दुधाची विक्री केली जायची. आता मात्र ४० हजार लीटरपर्यत खाली आहे.
मध्यंतरी महानंद डेयरी संघाला भारतीय लष्करासाठी दूध वितरण करण्याचा टेंडर मिळाल होता. मात्र टेंडर देऊन सुद्धा महानंद दूध वर्षभरासाठी पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याचे कारण देत लष्कराला दूध नाकारले होते. कारारानुसार आता १ ऑक्टोबर पासून १९ लाख ४५ हजार दूध देणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग, बारामुल्ला भाग, बंदीपुरा, अवंतिपूरा, डावर आणि खानाबल या लष्कराच्या भागाला दूध पुरवठा होणार नसल्याचे महानंद डेअरीने सांगितलं आहे. तसेच सरकारचे सुद्धा या दूध संघाकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच महानंद डेयरी वर ही वेळ आली आहे.
हे ही वाचा:
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
ठाकरे गटाच्या मशालीवर ‘या’ पक्षाने केला दावा
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
महानंद दूध संघाचे राज्यभर एकूण ८५ जिल्हा व तालुका दूध संघ आहेत. डेयरीच्या उपविधीनुसार सभासद संघांनी आपल्या एकूण संकलनाच्या किमान पाच टक्के तरी दूध महानंदाला पुरवणे बंधनकारक आहे. मात्र आता सध्या दुधाचा तुटवडा असल्याने बाजारात महानंद दूध ४० रुपये प्रती लीटर दर असून बाकीचे दूध संघ ४२ रुपये प्रतीलीटर दूध विकत आहेत. तसेच डेयरीच्या प्रशासन विभागाने दूध दर वाढविण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळेच महानंद डेयरीची आता पर्यत दूध विक्रीमध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.