काही महिन्यांपूर्वी महानंद दूध डेअरी हस्तांतराचा मुद्दा समोर आला होता. ही डेअरी गुजरातच्या अमूल डेअरीला देण्यात येत असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, याबाबत नवी अपडेट समोर आली आहे. ही डेअरी अमूलकडे न जाता ती मदर डेअरी या ब्रँडला देण्यात आली आहे. महानंद डेअरीचा ताबा आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटकडे गेला आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांची उपकंपनी असणाऱ्या गुजरातच्या मदर डेअरी यांना ‘महानंद’ चालवण्यासाठी देण्यात आली आहे.
मुंबईतल्या गोरेगाव येथे असलेली महानंदा डेअरी तोट्यात असल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाला याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याबरोबर करार करून महानंदा डेअरीचा ताबा त्यांना दिला आहे. महानंद डेअरीचा ताबा आता नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटकडे गेला असून नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांची उपकंपनी असणाऱ्या गुजरातच्या मदर डेअरी यांना ‘महानंद’ चालवण्यासाठी देण्यात आली आहे. असे असले तरी मात्र येथून निघणारे उत्पादन हे ‘महानंद’च्या नावाने असणार आहे. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डासोबत पाच वर्षासाठी हा करार करण्यात आला असून हा काळ महानंद डेअरी बोर्डच्या ताब्यात असणार आहे.
महानंदला पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारकडून मदर डेअरीला २५३ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. महानंद नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालवायला देण्याचा निर्णय महानंदच्या संचालक मंडळाने घेतला होता. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. मात्र, हा मुद्दा पकडून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांलो कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.
हे ही वाचा:
अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात ‘कौन घुसा’…बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा!
युक्रेन आता कैद्यांना भरती करणार सैन्य दलात
“खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?”
उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद? अल्पवयीन मुलीला धावत्या रेल्वेखाली फेकले
नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाकडून मदर डेअरीचे संचालन होते. महानंद ही राज्यातील शिखर संस्था होती. ती गेल्या काही काळापासून आर्थिक डबघाईला आली होती. यामुळे महानंदला गुजरातमधील केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील नॅशनल डेअरी डेव्हलेपमेंट बोर्डाला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. या बोर्डाचे मुख्यालय आणंद, गुजरातमध्ये आहे.