ओडिशातील महानदी पूरक्षेत्रात ४२४ एकराचा भराव घालून विकास कामे करण्याच्या निर्णयाला हरीत विकास लवादाच्या निर्णयामुळे फटका बसण्याची चिन्ह आहेत.
ओडीशातील महानदीच्या पात्राचे सपाटीकरण करून राज्य सरकारने तिथे वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर कायमस्वरुपी बांधकामे बांधायची सुरूवात केली आहे. पर्यावरणप्रेमी दिलीप कुमार सुमंत राय यांनी या निर्णयाच्या विरोधात हरित लावदाकडे दाद मागितली होती.
महानदीच्या पात्राचे होणारे कायमस्वरूपी नुकसान पर्यावरण संबंधि नियमांचे कठोरपणे पालन केले पाहीजे, अशी विनंती सुमंत राय यांनी हरीत लवादाला केली होती. त्यानंतर लवादाने या प्रकरणात हस्तक्षेप केला.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी जानेवारी महिन्यात ४२४ एकर पूरक्षेत्राचा विकास करणार असल्याची घोषणा केली होती. यात श्रीराम चंद्र भानजा (एससीबी) वैद्यकीय महाविद्यालयाचे नवे ग्रंथालय, विविध उद्याने, पादचारी मार्ग अशा विविध कामांचा समावेश आहे. हरित लवादाने, ही सर्व कामे पूरक्षेत्राला नुकसान न करता कायद्यानुरूप होत असल्याची खातरजमा करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे.