प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात बुधवारी (२९ जानेवारी) मौनी अमावस्येला साडेसात कोटींहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले. देशभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक महाकुंभात सामील होत आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे. महाकुंभात एकापाठोपाठ एक बॉलीवूड कलाकार संगमात स्नान करण्यासाठी येत आहेत. अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि त्यांची पत्नी अंकिता कोंवर यांनी मौनी अमावस्येला त्रिवेणी तीरावर पवित्र स्नान केले. अभिनेत्याने महाकुंभातील स्नानचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केल आहेत. महाकुंभाला आल्यानंतर धन्य वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाकुंभातील फोटो शेअर करत सोमणने म्हटले, मौनी अमावस्येच्या खास दिवशी अंकिता कोंवरसोबत महाकुंभात येण्याचा मला आनंद झाला. असे आध्यात्मिक ठिकाण आणि अनुभव मला आठवण करून देतात कि मी अस्तित्वाच्या विशालातेत किती लहान आहे आणि येथील आपला प्रत्येक क्षण किती खास आहे. तसेच महाकुंभमधील चेंगराचेंगरीच्या घटनेवर दुःख व्यक्त केले.
हे ही वाचा :
बसपा नेते रज्जुमाजरा हत्याकांडातील आरोपी चकमकीत ठार!
अमेरिकेत प्रवासी विमानाची लष्करी हेलिकॉप्टरला धडक, १८ जणांचा मृत्यू!
तेव्हा चप्पल सोडली आज ठाकरेंनाही सोडलं!
कोर्टाने निर्णय दिलाय आता तरी भोंगे उतरवा!
दरम्यान, आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी महाकुंभात सामील होत संगमात स्नान केले आहे. मंत्री, नेते, विरोधी पक्षातील नेतेही सोहळ्यात सामील होत संगमात स्नान करत आहेत. भाविकांची संख्या दररोज वाढत आहे. आतापर्यंत २७ करोड भाविकांनी संगमात स्नान केले आहे. १३ जानेवारी रोजी सुरु झालेला महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.