गेल्या आठवड्यात २२ व २३ जुलै दिवशी झालेल्या अतिवृष्टीने महाडसह संपूर्ण कोकणात पावसाने थैमान घातले. अनेक ठिकाणी महापूर आला, हा महापूर आता हळूहळू ओसरूही लागला. दरडीही कोसळल्या पण आता नवे संकट महाडवर आले आहे.
महापुरानंतर साथीच्या रोगांची आता सुरुवात होऊ लागली आहे. महापुराने परिसरात राहणाऱ्या लाखो नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त जणांनी आपले प्राण देखील गमावले आहेत. अनेकांच्या डोक्यावर राहायचे छप्पर उरलेले नाही.
पूरस्थिती नियंत्रणात येत असली तरी महाड परिसरात मध्ये एका वेगळ्या संकटाने आता डोके वर काढले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाबरोबर महाड मधील विविध साथीच्या रोगांनी नागरिकांची झोप उडवली आहे. महापूर ओसरल्यावर महाडमध्ये १५ जणांना लेप्टो स्पायरेसीस या साथीच्या रोगाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हे ही वाचा:
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे काय होणार?
दगडफेक करणाऱ्या दहशतवाद्यांना दणका
नाशिकमध्ये ‘नो हेल्मेट,नो पेट्रोल’
राज कुंद्राला ५ महिन्यांनी का अटक झाली?
यामुळे पूरग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांनी त्वरित आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतलं पाहिजे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून यावेळी करण्यात आले आहे. खरेतर, अतिवृष्टीने आलेल्या पुरामध्ये मानवी वस्तीत मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी एक ते दीड फुटांपर्यंत अजूनही चिखलाचा थर जमा झालेला आहे. ३ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत आता पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
कुजलेले धान्य, मृत्यूमुखी पडलेली शेकडो जनावरे यामुळे परिसरात दुर्गंधी देखील पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती अगोदरच आरोग्य प्रशासनाकडून व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर महाड मधील ११ ठिकाणी आणि पोलादपूर येथील २ ठिकाणी आरोग्य तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, लेप्टो स्पायरेसीस, कावीळ आणि कोरोना तसेच इतर जलजन्य आजारांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे महानगर पालिकांची आरोग्य पथके याठिकाणी काम करत असताना दिसून येत आहेत. धान्य कुजल्यामुळे आणि शेकडो जनावरे मेल्यामुळे दुर्गंधीही पसरली होती. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात होती. या ठिकाणी डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसीस, काविळ तसंच कोरोनासह इतर आजारांची तपासणी केली जात आहे.