गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम २०२४ समिटचे आयोजन या वर्षी दुबई येथे करण्यात आले आहे.२४ आणि २५ फेब्रुवारी असा हा दोन दिवसीय कार्यक्रम आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे या दोन दिवसीय समिटसाठी प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाबिझ २०२४ हा दोन दिवसांचा मेगा इव्हेंट असणार आहे.गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या वार्षिक सातव्या समिटमध्ये जगभरातून ८०० हुन अधिक उद्योगकांचा सहभाग अपेक्षित आहे.तसेच महाबीझ २०२४ साठी विविध क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आमंत्रित करण्यासाठी जीएमबीएफने देशातील विविध आघाडीच्या शहरांमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत .
हे ही वाचा:
माऊंट मेरापी ज्वालामुखीचा उद्रेक; ११ गिर्यारोहकांचा मृत्यू, १२ बेपत्ता!
केसीआर यांना तेलंगणात मात देणारे रेवंत रेड्डी कोण आहेत?
काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीवर अखिलेश सिंह यांचा वरचष्मा?
सिलक्यारा बोगद्याचे काम याच महिन्यात होणार सुरू!
यामध्ये जगभरातील उद्योजक ज्ञानाची देवाणघेवाण,नेटवर्कच्या संधी,व्यवसायाचे मार्ग आणि अर्थपूर्ण भागीदारीसाठी या समिटमध्ये उपस्थित राहणार आहेत.जीएमबीएफचे अध्यक्ष डॉ.सुनील मांजरेकर म्हणाले की, आगामी जीएमबीएफ ग्लोबल कॅम्पेन ड्राईव्हसाठी विशेष आमंत्रण देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.जीएमबीएफचे पूर्वीचे समितीचे पदाधिकारी महाबिझ २०२४ च्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत.
व्यवसायाचे नेटवर्क वाढवणे, ज्ञानाचे आदान-प्रदान आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यासाठी आम्ही तुमचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे डॉ.सुनील मांजरेकर यांनी सांगितले.हे अधिवेशन दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते.तसेच उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी या समिटमुळे असंख्य संधी निर्माण होणार आहेत, असे डॉ.सुनील मांजरेकर यांनी स्पष्ट केले.उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाला चालना देण्याचा या समिटचा मुख्य उद्देश आहे.दुबई येथे हा दोन दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मेट्रोपॉलिटन हॉटेल, दुबई येथे तर २५ फेब्रुवारी २०२४ रोजी अटलांटिस पाम दुबई येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.