महाकुंभ हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर तो भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा एक जिवंत संगम आहे, जो लोकांना त्यांची श्रद्धा पुन्हा जागृत करण्याची आणि देवाशी जवळीक साधण्याची संधी प्रदान करतो. प्रयागराजमधील महाकुंभ २०२५ चा हा कार्यक्रम सर्व भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे, जे श्रद्धा, एकता आणि भक्तीच्या या अनोख्या उत्सवात सहभागी होऊन आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेतील.
१३ जानेवारी २०२५ रोजी पौष पौर्णिमेच्या स्नानाने महाकुंभाची सुरुवात होईल आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्रीच्या शेवटच्या स्नानाने त्याची सांगता होईल. कुंभमेळ्यात पहिले स्नान संतांच्या नेतृत्वाखाली केले जाते, ज्याला कुंभाचे ‘शाही स्नान’ म्हणून ओळखले जाते आणि ते पहाटे ३ वाजता सुरू होते. संतांच्या शाही स्नानानंतर सामान्य लोकांना पवित्र नदीत स्नान करण्याची परवानगी मिळते.
महाकुंभमेळा १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी असा ४४ दिवस चालणार आहे. या दिवसात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सरकार आणि प्रशासनाला महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी तत्परतेने पूर्ण तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देशातील लाखो भक्त प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत, होत आहेत. यावेळी, संगम किनाऱ्यावर ४० कोटींहून अधिक लोक धार्मिक स्नान करण्यासाठी जमतील अशी माहिती आहे.
महाकुंभमेळा म्हणजे भाविकांसाठी शाही स्नान शाही स्नान खूप महत्वाचे मानले जाते. म्हणून या काळात लाखो भाविक गंगा नदीत शाही स्नान करतात. अशा परिस्थितीत, कोणताही अपघात टाळण्यासाठी, पोलिसांसोबत पाण्याखालील ड्रोनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हे ड्रोन ३०० मीटर खोलीपर्यंत निरीक्षण करू शकतात.
प्रयागराज जिल्हा प्रशासनाने महाकुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या तारखांना जास्त गर्दी असेल असे गृहीत धरून व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
१. १३ जानेवारी २०२५ – पौष पौर्णिमा
२. १४ जानेवारी २०२५ – मकर संक्रांत
३. २९ जानेवारी २०२५- मौनी अमावस्या (सोमवती)
४. ३ फेब्रुवारी २०२५ – वसंत पंचमी
५. १२ फेब्रुवारी २०२५ – माघी पौर्णिमा
६. २६ फेब्रुवारी २०२५ – महाशिवरात्री
हे ही वाचा :
राखेच्या टिप्परने घेतला सरपंचाचा बळी !
‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे
बहुप्रतीक्षित झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार !