माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर!

आतापर्यंत ६०५ कोटींची मालमत्ता जप्त

माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान खालसा होण्याच्या वाटेवर!

एकेकाळी हिंसाचारासाठी कुप्रसिद्ध असलेल्या माफिया डॉन मुख्तार अन्सारी याचे संस्थान आता खालसा होण्याच्या मार्गावर आहे. उत्तर प्रदेश सरकारने एकीकडे मुख्तारविरोधात न्यायालयात विविध खटले दाखल करून त्याची नाकाबंदी केली असतानाच, आता त्याचे उरलेसुरले साम्राज्यही नेस्तनाबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्तार अन्सारीने गुन्हेगारी मार्गाने मिळवलेली ६०५ कोटींहून अधिक संपत्ती सरकारने आतापर्यंत जप्त अथवा उद्ध्वस्त केली आहे.

न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात उत्तर प्रदेश सरकारतर्फे मुख्तारविरोधात मजबूत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच, संबंधित साक्षीपुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या १५ महिन्यांत मुख्तार याला सात प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यात जन्मठेपेच्या शिक्षेचाही समावेश आहे. मुख्तार याच्याविरोधात एकूण ६५ प्रकरणे दाखल आहेत.

हे ही वाचा:

आरक्षणाचे मारेकरी शरद पवारच!

३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

संसद हल्लाप्रकरणी महेश कुमावतला दिल्ली पोलिसांकडून अटक

अभिनेता अल्लू अर्जुनने दारू, पान मसाला ब्रँडची जाहिरात नाकारली

तसेच, त्याच्या पूर्ण गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यातील त्याच्या २९२ साथीदारांविरोधात १६० खटले दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या सुमारे १८६ साथीदरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सरकारने कठोर कारवाई केल्यामुळे मुख्तार गँगच्या १८ गुंडांनी आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी त्याच्या गँगकडून १७५ अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. तर, त्याच्या गँगचे पाच गुंड पोलिस चकमकीत मारले गेले आहेत.

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार अब्बास अन्सारी याला शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एमएलए न्यायालयात सादर करण्यात आले. मात्र वकिलांनी संप पुकारल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी ४ जानेवारी रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अब्बास अन्सारीसह सहा जणांना आरोपी बनवण्यात आले आहे.

Exit mobile version