मदरशात हिंदू मुलांचे काय काम?, लवकरात लवकर बाहेर काढावे!

एनसीपीसीआरची सरकारकडे मागणी, १,७५५ मदरशांमध्ये ९,४१७ हिंदू मुले

मदरशात हिंदू मुलांचे काय काम?, लवकरात लवकर बाहेर काढावे!

मध्य प्रदेशातील मदरशांमधून मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे (एनसीपीसीआर) अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी मदरशांशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे आणि सरकारने हिंदू मुलांना लवकरात लवकर मदरशांमधून बाहेर काढण्यात काढावे अशी विनंतीही केली आहे.

संपूर्ण प्रकरण काय?
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने उघड केले आहे की, मध्य प्रदेशात असे अनेक मदरसे सापडले आहेत जिथे हिंदू मुलांना इस्लामचे शिक्षण दिले जात आहे. एनसीपीसीआरचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सांगितले की, मध्यप्रदेशात एकूण १,७५५ नोंदणीकृत मदरसे असून या मदरशांमध्ये ९,४१७ हिंदू मुले शिकत आहेत. हिंदू मुलांना मदरशांमध्ये पाठवण्यावर त्यांनी तीव्र निषेध करत यावर त्वरित सुधारणा करावी, अशी विनंती मध्य प्रदेश सरकारला त्यांनी केली आहे.

मदरसांचे नियम
कानूनगो पुढे म्हणाले की, मध्य प्रदेश मदरसा बोर्ड स्थापनेचे जे अधिनियम आहेत, त्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, मदरशांमध्ये केवळ इस्लामिक धार्मिक शिक्षण दिले जावे.

हे ही वाचा..

जळगावच्या मन्यारखेडा तलावात मृत माशांचा खच!

२८८ चा कात्रजचा घाट…

उत्तराखंडमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात १० हून अधिक भाविकांचा मृत्यू

ठाण्यातून ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेविका मुख्यमंत्री शिंदेच्या गटात सामील!

मदरशांतील शिक्षकांकडे पदव्याही नाहीत
एनसीपीसीआरच्या माहितीनुसार, या मदरशांतील शिक्षकांकडे बी.एडची पदवी देखील नाहीये आणि त्यांनी शिक्षण पात्रतेची परीक्षाही दिली नाही. मदरशांची पायाभूत सुविधा आरटीई कायद्यानुसार नसल्याचा दावा त्यांनी केला. मदरशांमधील सुरक्षा व्यवस्थाही चांगली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुस्लीम मुलांनाही स्वतंत्रपणे शिक्षण दिले पाहिजे
ते पुढे म्हणाले की, नोंदणी नसलेल्या मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुस्लिम मुलांनाही सामान्य शाळेत पाठवले पाहिजे. कानुनगो म्हणाले, ‘मी मध्य प्रदेश सरकारला विनंती करतो की, मदरशांमध्ये शिकणाऱ्या हिंदू मुलांना तेथून बाहेर काढावे. सरकारने या संपूर्ण योजनेचा विचार करावा आणि मदरशांमधून हिंदू मुलांना ताबडतोब बाहेर काढून सामान्य शाळांमध्ये पाठवावे.

Exit mobile version