चेहऱ्यावर लघुशंका करण्याऱ्या आरोपी शुक्लाच्या घरावर ‘बुलडोझर’ !

आरोपीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई,मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

चेहऱ्यावर लघुशंका करण्याऱ्या आरोपी शुक्लाच्या घरावर ‘बुलडोझर’ !

मध्य प्रदेशातील सिधी भागातून एक लज्जास्पद घटना समोर आली होती. त्यात नशेमध्ये धुंद असलेला एक व्यक्ती पायऱ्यांवर बसलेल्या एका आदिवासी युवकावर लघुशंका करत असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता.त्यानंतर संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रवेश शुक्ला असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून तो एक भाजप कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत होते. लघुशंकेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने त्याच्याविरोधात संतापाची लाट उसळली.घटनेची दखल घेत आरोपी प्रवेश शुक्ला याच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी कारवाई करत आरोपीचे घर पाडण्यासाठी दारात बुलडोझर पाठवला आहे. या सोबतच आरोपी शुक्लावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) देखील लावण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात प्रवेश शुक्ला नावाच्या या कार्यकर्त्याने एका दलित आदिवासाच्या चेहऱ्यावर लघुशंका केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांनी तपास करत प्रवेश शुक्ला यांना मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. या घटनेचा निषेध करत सीएम शिवराज यांनी आरोपी प्रवेश शुक्लावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता जिल्हा प्रशासनाचे पथक बुलडोझरसह मूळ घोटाळ्यातील आरोपीच्या घरी पोहोचले आहे.
मध्य प्रदेशातील लघवीच्या घटनेनंतर सर्वच विरोधी पक्षाने भाजपला घेरण्यास सुरुवात केली होती.आरोपीवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करावी अशीही मागणी होत होती.

हे ही वाचा:

क्रिती सॅननच्या प्रॉडक्शन हाऊसशी सुशांत सिंगचं काय आहे कनेक्शन?

शरद पवार हे विठ्ठल; विठ्ठलाला पक्षातील बडव्यांनी घेरलं

वरळी सी- फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

तीन महिने तरी टोमॅटोचे दर चढेच राहणार

त्याबरोबर आरोपीच्या घरावर बुलडोझरसह कारवाईची मागणी ही जोर धरू लागली होती. ‘असे घृणास्पद आणि खालच्या स्तराचे कृत्य करणाऱ्याचे सभ्य समाजात स्थान असता कामा नये. हा आरोपी भाजपशी संबंधित असल्याचे समोर येत आहे,’ असा आरोप कमलनाथ यांनी केला होता. मध्य प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि आदिवासी नेता विक्रांत भुरिया यांनीही ‘भाजप आदिवासीविरोधी आहे, हेच यावरून कळते आहे,’ असे म्हटले होते.यावेळी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोपी प्रवेश शुक्लाचे बेकायदा बांधकाम पाडले जाईल, असे सांगितले होते.

 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या पथकासह मोठ्या संख्येने पोलिसांचा ताफा आरोपीच्या घरी पोहोचला. घरासमोर बुलडोझर पाहून प्रवेश शुक्लाचे आई आणि त्याची काकू बेशुद्ध पडल्या. तेथे उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीच्या आई आणि काकूला समजावून सांगितले. प्रवेश शुक्ला ची आई रडत रडत म्हणाली की, मुलाने चूक केली आहे त्याला शिक्षा करा पण माझे घर पाडू नका.घडलेली घटना ही अत्यंत लज्जास्पद असून मुख्यमंत्री चौहान यांनी आरोपीच्या घराच्या दारात बुजडोझर पाठवून तसेच आरोपी शुक्लावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत गुन्हा दाखल करत कारवाई केली आहे.

Exit mobile version