मध्य प्रदेशाच्या इंदोरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भोपाळजवळील मंडीदीप येथे नातेवाईकांच्या घरी ते लपून बसले होते. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केली असून आरोपींना इंदोरला आणण्यात येत आहे.
इंदोर शहरातील चिमणबाग परिसरात रविवारी (२३ जून) पहाटेच्या वेळेस भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मोनू कल्याणे असे हत्या करण्यात आलेल्या भाजप नेत्याचे नाव असून त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. तसेच मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा ते निकटवर्तीय होते.
हे ही वाचा:
अफगाणिस्तनाने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपबाहेर काढले!
पुण्यात ड्रग्ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर फिरवणार; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश
गँगस्टर विकास दुबेची मालमत्ता जप्त होणार
दक्षिण दिल्लीत गायीचे शव सापडल्यानंतर धमक्या, द्वेषयुक्त भाषणे
चिमणबाग परिसरात बॅनर आणि पोस्टर लावण्याचे काम सुरु असताना पियुष आणि अर्जुन या दोन तरुणांनी मोनू कल्याणे यांच्याशी संवाद साधत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले. मोनू कल्याणे यांच्या मित्रांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी अखेर आरोपींचा शोध घेऊन दोघांनाही अटक केली आहे. भोपाळजवळील मंडीदीप येथून दोघा आरोपीना ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी आपल्या नातेवाईकांच्या घरी लपून बसले होते. मोबाईलचे लास्ट लोकेशन मंडीदीपजवळ दाखवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी करत दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे.