24 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरविशेषमुंबई इंडियन्स ‘आकाश’ भरून पावले

मुंबई इंडियन्स ‘आकाश’ भरून पावले

मढवालने ५ धावांत घेतले ५ बळी, लखनऊवर मात करून क्वालिफायर २मध्ये धडक

Google News Follow

Related

भारतीय आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज आकाश मढवालने बुधवारचा दिवस गाजवला. ३.३ षटकांत त्याने अवघ्या ५ धावा देत मुंबई इंडियन्सला एक रोमहर्षक विजय मिळवून दिला. लखनऊ सुपर जायन्ट्सवर मुंबईने ८१ धावांनी मात करत क्वालिफायर २मध्ये धडक दिली. मुंबई इंडियन्स आता या आयपीएलच्या विजेतेपदापासून केवळ दोन सामने दूर आहेत.

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना आता क्वालिफायर वनमधील पराभूत गुजरातशी हो्णार असून त्यानंतर अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी कोण झुंजणार हे निश्चित होईल.

उत्तराखंडचा मढवाल हा बुधवारच्या दिवसातील स्टार ठरला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने केलेल्या १८२ धावांना उत्तर देताना ३ बाद ७४ या स्थितीत असलेला लखनऊचा संघ १०१ धावांत गुंडाळला गेला.

मढवालला मुंबई इंडियन्सने २० लाखात आपल्या ताफ्यात घेतले. प्रारंभी मुंबई इंडियन्सच्या प्रारंभिक डावपेचात मढवालचा समावेश नव्हता. या हंगामात मढवालने १२९ चेंडू टाकले. त्यातले अर्धे चेंडू हे १७ ते २० षटकांत टाकले होते. म्हणजे अत्यंत आव्हानात्मक स्थितीत त्याने गोलंदाजी केली होती.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड हेच करमुसे अपहरण प्रकरणाचे सूत्रधार…

कोकणातील गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात कसे फुल होते?

जितेंद्र आव्हाडांविरोधात चौथे आरोपपत्र, करमुसे मारहाण प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा

संसद भवनाच्या उद्घाटनाला विरोधकांचे अवलक्षण

मढवालच्या गोलंदाजीची छाप पडली ती मधल्या षटकांत दोन चेंडूत त्याने दोन बळी घेतले. २१ चेंडूंपैकी १७ चेंडू त्याने निर्धाव टाकले. आयपीएलच्या इतिहासात प्ले ऑफमध्ये कुणीही इतकी प्रभावी गोलंदाजी केली नव्हती. प्रेरक मंकड (३) आयुष बदोनी (१), निकोलस पूरण (०). रवी बिष्णोई (३), मोहसिन खान (०) हे लखनऊचे फलंदाज मढवालने टिपले. त्यापैकी एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

मुंबई इंडियन्सतर्फे कॅमेरून ग्रीनने ४१, सूर्यकुमार यादव ३३, तिलक वर्मा २६, यांनी आपल्या संघाला १८२ धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. लखनऊतर्फे केवळ मार्कस स्टॉइनिस याने ४० धावांची सर्वोच्च खेळी केली.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा