माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन

आज दुपारी होणार अंत्यसंस्कार

माधुरी दीक्षित यांच्या आईचे वृद्धापकाळाने  निधन

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे आज सकाळी निधन झाले आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी आठ वाजून ४० मिनिटांनी निधन झाले आहे. स्नेहलता दीक्षित यांचे वय ९१ वर्षे होते. आईच्या मृत्यूमुळे माधुरी दीक्षित यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. माधुरी या शेंडेफळ असल्यामुळे आईच्या फारच जवळ होत्या. आता आईचे छत्र हरपल्यामुळे त्या फार दुःखी झाल्या आहेत. आज दुपारी तीन ते चारच्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

माधुरीने जागवल्या आईच्या आठवणी
माधुरी दीक्षित ने गेल्या वर्षी जून महिन्यात तिच्या आईचा ९० वा वाढदिवस साजरा केला आणि तिच्या आईचे वाढदिवस साजरा करतानाचे फोटो माधुरीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते. आपल्या आईसोबत आठवणी शेअर करताना माधुरीने लिहिले होते कि, वाढदिवसाच्या शुभेच्छा. आई ही मुलीची सर्वांत चांगली मैत्रीण असते. असे म्हणतात. ते खरंच बरोबर आहे. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही , तू मला शिकवलेले धडे ही तू मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. मी तुम्हाला फक्त चांगले आरोग्य आणि आनंदाची इच्छा करते. असे तिने लिहिले होते. माधुरी दीक्षित च्या करियरच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये तिच्या आईने तिला खूप मोलाची साथ दिली. चित्रपटाचे शूटिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम माधुरी बरोबर तिची आई नेहमीच असायची. मी खूप मोठी स्टार किंवा सेलिब्रिटी आहे असे मला कधीच वाटले नाही कारण सामान्य जीवन जगण्यात माझ्या  आईचा खूप मोठा वाटा आहे. आईमुळे आमचे पाय कायम जमिनीवर असायचे.

हे ही वाचा:

सदानंद कदम ईडीच्या ताब्यात.. लवकरच न्यायालयात हजर करणार

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’

तेजस्वी यादव, लालू यादवांच्या मुलींच्या घरातून मिळाली रोकड, २ किलो सोने

मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा धाड; समर्थकाने डोके फोडून घेतले

दरम्यान, चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांनी माधुरीच्या आई स्नेहलता दीक्षित यांची आठवण सांगितली. जेव्हा २०१३ मध्ये गुलाब गॅंग या चित्रपटासाठी आम्ही माधुरीला गाणे गाण्यासाठी संपर्क साधला तेव्हा तिने आनंदाने होकार दिला. जेव्हा ती रेकॉर्डिंगला आली तेव्हा माधुरी आपल्या आईसोबत आली होती त्यावेळेस आम्हाला कळले माधुरीच्या आई चांगल्या गायिका आहेत. म्हणून आम्ही तिच्या आईला विचारले की त्या गाणे गाऊ शकतात का आणि शेवटी माधुरी आणि तिची आई या दोघीनींही गाणे या चित्रपटासाठी गेले.

 

Exit mobile version