ओवैसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

ओवैसींविरोधात लढणाऱ्या माधवी लता यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

हैद्राबादमध्ये एआयएमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी यांच्या विरोधात भारतीय जास्न्ता पक्षाकडून माधवी लता यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. एक शास्त्रीय नृत्य करणाऱ्या माधवी लता या पहिल्यांदाच राजकारणात आल्या आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवारी देण्याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हते. त्यांना त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्तवाहिन्यामधून समजले. भाजपने त्यांना ‘तीन तलाक’च्या मुद्य्यावरील अभियानाचा खास चेहरा बनवले होते. इंडिया न्यूजच्या “आप की अदालत” या कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या युगाचा ‘महायोगी’ असे संबोधले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांनी त्यात माधवी लता यांचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, आपकी अदालत हा जो माधवी लता यांचा कार्यक्रम असाधारण आहे. लता यांनी अत्यंत ठोसपणे मुद्दे मांडले आहेत. अगदी तर्काला धरून माधवी लता या कार्यक्रमात बोलल्या आहेत. हा कार्यक्रम सर्वांनी बघावा असे आवाहान त्यांनी केले आहे.

हेही वाचा..

मोदीच्या गॅरंटीमुळे इंडी आघाडी चिंतेत!

पंजाबमध्ये ५५ वर्षीय महिलेची नग्न धिंड; तिघांना अटक, दोघांचा शोध सुरू

कंगना रनौटमुळे सुरू झाली चर्चा; बरकतुल्लाह, सुभाषचंद्र बोस की नेहरू?

कॉंग्रेसची नारी न्याय योजना दिशाभूल करणारी

दरम्यान आप कि आदालत या कार्यक्रमात बोलतान माधवी लता म्हणाल्या की, आता मी पंतप्रधान मोदिजींना भेटू शकते. यापूर्वी कधीही पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झालेली नाही. ते मला ओळखत सुद्धा नाहीत. केवळ माझ्या सामाजिक कार्याच्या आधारावर माझ्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. आपण गेल्या २० वर्षांपासून हे काम करत आहे.
माधवी लता म्हणाल्या आपण कधी राजकारण केले नाही आणि आमच्या घरी सुद्धा कोणी राजकारणात सक्रीय नव्हते. ओवेसी यांच्याबद्दल त्या म्हणाल्या, हैद्राबाद हा काही ओवेसी यांचा गड वगैरे नाही. त्यांना पक्ष ज्या मातीतून तयार झाला आहे त्याला तोडणे खूप सोपे आहे. आपण ओवेसी यांना प्रतिस्पर्धी मानत नाही. यावेळी ओवेसी हे कमीत कमी दीड लाख मतांनी पराभूत होतील.

Exit mobile version