सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अध्यक्षपदी माधबी पुरी बुच यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेबीचे विद्यमान अध्यक्ष अजय त्यागी यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे या पदाची जबाबदारी आता माधबी पुरी बुच यांना देण्यात आली आहे. यासंदर्भात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने माहिती दिली आहे. ही नियुक्ती सुरुवातीला तीन वर्षांच्या कालावधीसाठी असल्याचे वृत्त आहे.
सेबीच्या पूर्णवेळ सदस्या म्हणून त्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२१ मध्ये संपला. सेबीच्या प्रमुख बनलेल्या खाजगी क्षेत्रातील माधबी पुरी बुच या पहिल्या व्यक्ती आहेत. माधबी पुरी बुच यांनी अजय त्यागी यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यांनी सामूहिक गुंतवणूक योजना आणि गुंतवणूक व्यवस्थापन यासारखे महत्त्वाचे पोर्टफोलिओ हाताळले आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी
युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री
रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त
श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासह भारताने रचले हे नवे विक्रम
अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून (IIM), त्यांनी शिक्षण घेतले असून तीन दशकांचा आर्थिक बाजाराचा त्यांना अनुभव आहे. १९८९ मध्ये त्या आयसीआयसीआय बँकेत रुजू झाल्या. परदेशात जाण्यापूर्वी त्यांना देशांतर्गत गुंतवणूक बँकेचे प्रमुख केले होते. ब्रिक्स राष्ट्रांच्या गटाने स्थापन केलेल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे.