पाकिस्तानमध्ये काय घडू शकते याबद्दल काहीही सांगता येत नाही. रविवारी, २३ मार्च रोजी पाकिस्तान दिन साजरा करण्यात आला. या काळात संपूर्ण पाकिस्तानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या खास प्रसंगी, पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले आणि लष्कराच्या कार्यक्रमातही भाग घेतला. यावेळी झरदारी यांनी ज्या पद्धतीने भाषण दिले त्याची चर्चा संपूर्ण पाकिस्तानात होत आहे. राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी दिलेल्या भाषणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की त्यांना त्यांचे भाषण वाचण्यात खूप अडचण येत आहे. यानंतर अनेकांनी त्यांना ट्रोल केले.
आसिफ अली झरदारी यांच्या भाषणावर पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी प्रतिक्रिया दिली. बासित यांनी भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले, आसिफ झरदारी त्यांचे भाषण वाचताना असहाय्य दिसत होते, ते खूप वेदनादायक होते. देशाचा राष्ट्रपती संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतो. अशा परिस्थितीत, त्यांच्यावर जे विनोद केले जात आहेत, ते एक प्रकारे प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीवर विनोद आहे.
अब्दुल बासित पुढे म्हणाले, आसिफ झरदारी यांना प्रत्येक शब्द वाचणे कठीण होत होते, हे स्पष्टपणे दिसून येत होते. त्यांना धड व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते. अशा परिस्थितीत, एक प्रश्न असा आहे की ते आजारी होते का? जर ते आजारी असतील तर त्यांना भाषण देण्यासाठी का आणले गेले? त्यांच्या टीमने त्यांना आधीच भाषण दिले नव्हते का?, जर त्यांनी ते दोन-तीन वेळा वाचेल असते तर कदाचित त्यांना वाचताना कोणतीही अडचण आली नसती. जे घडले ते घडायला नको होते असे मला वाटते, असे अब्दुल बासित म्हणाले.
हे ही वाचा :
इम्युनिटी मजबुतीसाठी तुळशीचा काढा घ्या!
नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!
कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईचा बडगा
…म्हणे राणा सांगाने बाबरला भारतात आमंत्रित केले होते! काय आहे सत्य?