‘पगडी घालून पंतप्रधान मोदी पोहचले गुरुद्वारात, स्वतः रोटी लाटून जेवणही वाढलं’

पंतप्रधान मोदींनी बिहारच्या पटण्यातील गुरुद्वाराला दिली भेट

‘पगडी घालून पंतप्रधान मोदी पोहचले गुरुद्वारात, स्वतः रोटी लाटून जेवणही वाढलं’

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(१३ मे) बिहारच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी पंतप्रधानांनी पटनातील गुरु गोविंद सिंह जी महाराज यांचे जन्मस्थळ श्री हरिमंदिरजी पटना साहिब गुरुद्वारात पोहोचले आणि पगडी घालून गुरुद्वारात दर्शन घेतलं

यावेळी गुरुद्वारा व्यवस्थापनाकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आलं.पंतप्रधान मोदींनी स्वतः गुरुद्वारातील स्वयंपाक घरात जाऊन जेवण तयार केलं. पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारात रोटी बनवल्या आणि स्वत: जेवणही वाढलं.पटना साहिब गुरुद्वारामध्ये उपस्थित लोकांना जेवण देत असताना पंतप्रधान मोदी खूप आनंदी दिसत होते.पंतप्रधान मोदी जवळपास २० मिनिटे गुरुद्वारात होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री रवि शंकर प्रसाद आणि अश्विनी चौबे हेसुद्धा होते.पंतप्रधान मोदींनी गुरुद्वारामध्ये दिलेल्या सेवेचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत.व्हिडिओमध्ये लोकांची सेवा करताना पंतप्रधान मोदी अत्यंत आनंदी दिसत आहेत.

हे ही वाचा:

केजरीवाल चीनकडून जमीन मिळवून देणार!

‘मोदींशी चर्चा करायला राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय?’

बद्रीनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले

‘उद्धव ठाकरे हा निलाजरा माणूस’

पंतप्रधान मोदी गुरुद्वाराला भेट देणार असल्याने परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता.दरम्यान, तख्त श्री पटना साहिब, ज्याला तख्त श्री हरमंदिर जी, पटना साहिब म्हणूनही ओळखले जाते, हे शिखांच्या पाच तख्तांपैकी एक आहे. गुरु गोविंद सिंग यांचे जन्मस्थान म्हणून हे तख्त महाराजा रणजित सिंग यांनी १८ व्या शतकात बांधले होते.पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, शिखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंग यांचा जन्म १६६६ मध्ये पाटणा येथे झाला होता. आनंदपूर साहिबला जाण्यापूर्वी त्यांनी सुरुवातीची वर्षे येथे घालवली.

Exit mobile version