23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधेही आता भारत आत्मनिर्भर

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मधेही आता भारत आत्मनिर्भर

Google News Follow

Related

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु असून जवळपास सर्वच राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. वर्तमान परिस्थितीत ऑक्सिजन सिलिंडर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. म्हणूनच सध्या एक पर्याय म्हणून ऑक्सिजन कंसेंटेटरची मागणी वाढत आहे. ज्याचा उपयोग खास करुन (होम आयसोलेशन) घरात उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रूग्णालयातही होऊ शकतो. असाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मेक इन इंडियाच्या संकल्पनेतून मुंबईच्या एका मराठी तरुणाने बनविला आहे. यात भारतीय साहित्य सामग्रीचा वापर करण्यात आला आहे.

अंकुर पुराणिक हा मुंबईत राहणारा मराठी तरुण व्यवसायाने तंत्रज्ञ आहे. सध्या देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि आपण परदेशातून ऑक्सिजन मागवीत आहोत. पण अंकुर ह्यांनी शुद्ध भारतीय साधन सामग्रीचा वापर करत आवश्यकतेनुसार ऑक्सिजनची पूर्तता करण्याचा एक पर्याय म्हणून आक्सिजन कॉन्सन्ट्रेटर डिव्हाईस तयार केला आहे. ज्यामुळे घरीच तेही २४ तास आक्सिजन निर्मिती होऊ शकते.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात आगींचे सत्र सुरूच

शाळा बंद झाल्यामुळे २४ हजार बस चालक अडचणीत

निवडणुक आयोग विजय मिरवणुकांवर नाराज

आसाममध्ये भाजपाचा दणदणीत विजय निश्चित

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भिन्न भिन्न क्षमतांचे असू शकतात. छोटे पोर्टेबल कॉन्सन्ट्रेटर एका मिनिटाला एक किंवा दोन लिटर ऑक्सिजन प्रदान करू शकतात, तर मोठ्या कॉन्सन्ट्रेटरमध्ये प्रति मिनिट ५ किंवा १० लिटर ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता असते. यातून  मिळणारा ऑक्सिजन हा ९० ते ९५ टक्के शुद्ध असतो. कॉन्सन्ट्रेटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा नियमित करण्यासाठी  प्रेशर वाल्व बसविले जातात. वर्ष २०१५ मध्ये डब्ल्यूएचओने जाहिर केलेल्या अहवालानुसार, कॉन्सन्ट्रेटर हे सतत काम करू शकतात आणि ज्यामुळे दीर्घ काळापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा सतत होऊ शकतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा