लुधियाना प्राणीसंग्रहालयात तीन महिन्यांपूर्वी वयोवृद्ध झालेल्या चिराग या वाघिणीचा मृत्यू झाला होता.त्यानंतर प्राणीसंग्रहालयात ७ वर्षांचा नर वाघ ‘नव’ हा एकमेव वाघ शिल्लक राहिला होता.त्याचाही आता मृत्यू झाला आहे. ‘नव’ वाघाच्या मृत्यूने लुधियाना प्राणीसंग्रहालयातील टायगर सफारी रिकामी आणि पर्यटकांसाठी पुन्हा बंद झाली आहे.नर वाघाच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे वन्यजीव अधिकाऱ्यांनी सांगितले.
वन्यजीव अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, नर ‘नव’ वाघ ३० जानेवारीपर्यंत तंदुरुस्त आणि सक्रिय होता. मात्र, ३१ जानेवारीला सकाळी तो शांत बसल्याचे लक्षात आले. तत्काळ पशुवैद्यकांना बोलावून सायंकाळपर्यंत त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तो जगू शकला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, ‘नव’ नर वाघाला पंजाब येथील छतबीर प्राणीसंग्रहालयातून १८ ऑक्टोबर २०२१ लुधियाना सफारीमध्ये आणण्यात आले होते.
या संदर्भात लुधियाना प्राणीसंग्रहालयाचे प्रभारी रेंज ऑफिसर प्रितपाल सिंग म्हणाले की, ‘नव’ च्या मृत्त्यूने आम्हाला दुःख झाले आहे.नव हा तरुण आणि आकर्षित,लोकप्रिय होता. ३० जानेवारी पर्यंत तो चांगला तंदरुस्त होता.तो सकाळी ९ ते ५ च्या वाजेपर्यंत जंगलात राहिला.त्यानंतर त्याला बंदिस्तघरात पाठविल्यानंतर तो व्यवस्थित होता.
हे ही वाचा:
‘तो’ वादग्रस्त भाग सहावीच्या पुस्तकातून काढला
शुभमन गिलचे तिसरे कसोटी शतक; इंग्लंडला हव्यात ३३२ धावा
धुळ्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त!
२००४ ची चूक पुन्हा नको; लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना इशारा!
परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी कर्मचारी त्याला खायला द्यायला गेले तेव्हा तो आजारी असल्याचे आढळून आले. “आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावले त्यांनी त्याला उपचार दिले पण संध्याकाळी नवचा मृत्यू झाला.शवविच्छेदनाच्या अहवालानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण कळू शकेल, असे प्रितपाल सिंग यांनी सांगितले.तसेच लुधियाना सफारीसाठी लवकरच आणखी वाघांची मागणी करणार असल्याचे आरओ प्रितपाल सिंह यांनी सांगितले. हिवाळ्यानंतर प्राणीसंग्रहालयासाठी बिबट्या आणण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या अगोदर लुधियाना प्राणीसंग्रहालयात ५ ऑक्टोबर २०२३ रोजी १६ वर्षाची वाघीण चिरागचा मृत्यू झाला होता. वाघीण चिराग ही प्राणीसंग्रहालयातील एकमेव वाघीण होती.त्यानंतर ‘नव’ नर वाघाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राणीसंग्रहालयात ‘नव’ वाघ देखील एकमेव नर होता.याच्या मृत्यूने प्राणीसंग्रहालयात एकही वाघ शिल्लक नसल्याने लुधियाना टायगर सफारी रिकामी आणि पर्यटकांसाठी बंद झाली आहे.