लखनऊ- रामेश्वर रेल्वे गाडीला आग लागून आठ जणांचा मृत्यू

अपघातात २० जण जखमी

लखनऊ- रामेश्वर रेल्वे गाडीला आग लागून आठ जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लखनऊ- रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ट्रेनच्या एका डब्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे घडल्याचं समोर आलं आहे. या आगीत ट्रेनचा डबा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. तर, या घटनेमध्ये आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, २० जण जखमी झाले आहेत.

लखनऊहून रामेश्वरमला निघालेली ही ट्रेन सकाळी साडेपाच वाजता मदुराई स्टेशनवर थांबली होती. या ट्रेनच्या टूरिस्ट कोचमध्ये ही आग लागल्याची घटना घडली. मदुरई स्थानकाजवळ ही ट्रेन पोहोचल्यानंतर पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मदुराई यार्ड जंक्शनजवळ ट्रेन थांबलेली असताना आग लागल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

हे ही वाचा:

भारताचे तिघे भालाफेकीच्या अंतिम फेरीत

तेलंगणाची ‘सूरही’ ते नागालँडची ‘शाल’, ब्रिक्स परिषदेतील नेत्यांना मोदींकडून भेट !

अजित पवारांना आता पुन्हा संधी नाही!

आयआयटी मुंबईला अज्ञात व्यक्तीकडून १६० कोटींची देणगी

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या डब्ब्याला आग लागली तो एक खासगी डब्बा होता. नागरकोइल जंक्शन येथे शुक्रवारी हा डब्बा जोडण्यात आला होता. त्या काही प्रवासी अवैद्यरित्या सिलेंडर घेऊन निघाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरमुळं डब्ब्याला आग लागली असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. गाडीचा एक डब्बा पूर्णपणे जळाला असून इतर डब्बे सुरक्षित असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितले.

Exit mobile version