एबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस

एबीपीच्या राजीव खांडेकरांना खोट्या बातमीसाठी नोटीस

एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांना फेक न्यूज अर्थात खोटी बातमी पसरवल्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. लीगल राईट्स ऑबजर्वेटरी या सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या संस्थेकडून ही नोटीस बजावली गेली आहे. कोविड लसीच्या पुरवठ्या संदर्भात खोटे वार्तांकन करून लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप खांडेकर यांच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात सध्या लसीकरणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष रंगलेला आहे. गुरुवारी यात पत्रकारांची एन्ट्री झालेली दिसली. एबीपी माझा वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनी ठाकरे सरकारच्या बाजूने केंद्र सरकारला लक्ष्य करायचा प्रयत्न केला. लसीकरणाच्या विषयात ट्विट करताना राजीव खांडेकर म्हणाले, “महाराष्ट्रात देशातील तब्बल ५६ टक्के कोरोनाबाधित आहेत आणि उत्तर प्रदेशात अवघे ३ टक्के! पण महाराष्ट्राला ७ लाख ४० हजार डोस दिले जाणार आणि उत्तर प्रदेशला ४४ लाख” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर पक्षपाताचा आरोप केला.

हे ही वाचा:

भारताच्या नौकानयनपटूंनी रचला इतिहास

मध्य रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद

ठाकरे सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेला नाहक त्रास

ममतांच्या भवानीपूरमध्ये अमित शहांचा झंझावात

खांडेकरांच्या याच ट्विटमुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या या ट्विटमध्ये आणि वाहिनीच्या बातमीमध्ये खांडेकर यांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला १ कोटीपेक्षा जास्त लसी आलेल्या असतानाही महाराष्ट्राला फक्त ७ लाख लसी दिल्या असे सांगत केंद्र सरकारवर खोटे आरोप केले. यावरूनच एलआरओ या संस्थेकडून खांडेकरांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

एबीपी माझा आणि संपादक राजीव खांडेकर यांनी केंद्र सरकारने आजपर्यंत पुरविलेल्या १ कोटी ७ लाख वॅक्सिन डोसचा आकडा फक्त ७.५ लाख दाखवून अफवा पसरवल्याबद्दल खांडेकर आणि चॅनलला “एपीडिमिक डिसिजेस ऍक्ट १८९७” अंतर्गत कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवण्यात आली असल्याचे एलआरओच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.

Exit mobile version