एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

भारतीय तेल कंपन्यांनी १ ऑगस्ट रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किंमती अपडेट केल्या आहेत. दरम्यान, या किंमतींमुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत १०० रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी एलीपीजी गॅसच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यानुसार, व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ९९.७५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्चपासून घरगुती गॅसच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. केवळ घरगुती गॅसच्या किमतीतच नाही तर काही महिन्यांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बराच काळ बदल झालेला नाही.

हे ही वाचा:

ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू

…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अजूनही शिल्लक १९९९चे प्रकरण

नोकरी जमीन घोटाळा प्रकरणात लालूंची ६ कोटींची मालमत्ता जप्त !

प्रमुख शहरांमधील व्यावसायिक गॅसचे दर

Exit mobile version