27 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेषएलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा

Google News Follow

Related

भारतीय तेल कंपन्यांनी १ ऑगस्ट रोजी घरगुती गॅस आणि व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या सिलेंडरच्या किंमती अपडेट केल्या आहेत. दरम्यान, या किंमतींमुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत १०० रुपयांची मोठी कपात करण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी एलीपीजी गॅसच्या दरात मोठी कपात केली आहे. त्यानुसार, व्यावसायिक एलपीजी सिलेंडर ९९.७५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही.

घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मार्चपासून घरगुती गॅसच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये १४.२ किलो घरगुती एलपीजीच्या किमतींत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. केवळ घरगुती गॅसच्या किमतीतच नाही तर काही महिन्यांपासून सीएनजी आणि पीएनजीच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बराच काळ बदल झालेला नाही.

हे ही वाचा:

ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू

…तरीही ब्रृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघ ताब्यात ठेवण्याच्या तयारीत

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांसमोर अजूनही शिल्लक १९९९चे प्रकरण

नोकरी जमीन घोटाळा प्रकरणात लालूंची ६ कोटींची मालमत्ता जप्त !

प्रमुख शहरांमधील व्यावसायिक गॅसचे दर

  • मुंबई – १६४०.५० रुपये
  • ठाणे – १६४०.५० रुपये
  • पुणे – १७०१ रुपये
  • नाशिक – १७१६ रुपये
  • नागपूर – १८६४.५० रुपये
  • छत्रपती संभाजीनगर – १७४५ रुपये
  • सिंधुदुर्ग – १६८७ रुपये
  • कोल्हापूर – १६६० रुपये
  • सोलापूर – १७३२ रुपये
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा