महागाईच्या भडक्यात सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सिलिंडरवर प्रति सिलिंडर ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, ‘एलपीजीच्या किमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ होईल. पीएमयुवाय लाभार्थ्यांसाठी ५०० रुपयांवरून ५५० रुपये इतकी होईल तर इतरांसाठी ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये इतकी होईल. या नवीन किमती आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
अलिकडेच तेल विपणन कंपन्यांनी व्यायसायिक एलपीजी गॅसच्या किमती ४१ रुपयांनी कमी केल्या होत्या. यानंतर, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १७६२ रुपये झाली. नवीन किमती १ एप्रिल २०२५ पासून लागू करण्यात आल्या. यापूर्वी, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत १८०३ रुपये होती.
हे ही वाचा :
सौदी अरेबियाने भारतासह १४ देशांच्या व्हिसावर घातली बंदी; कारण काय?
पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात २ रुपयांची वाढ; ग्राहकांवर काय होणार परिणाम?
“टीम इंडियातून बाहेर – पण आयपीएलमध्ये फायर!”
मुलीला रस्त्यात छेडले, कर्नाटकचे गृहमंत्री म्हणतात, अशा घटना घडत असतात!
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झाला असला तरी, १४.२ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
आयओसीएलनुसार, सध्या दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे. मुंबईत ही किंमत ८०२.५० रुपये, कोलकातामध्ये ८२९ रुपये आणि चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ८१८.५० रुपये आहे. याच दरम्यान, आता किमतीत वाढ झाल्याने सर्व सामान्य माणसाच्या खिशावर भार पडणार आहे.