देशातील १० मोठ्या राज्यांमध्ये एसटी बस चालक आणि वाहकांना सर्वात कमी पगार मिळतो. असे असतानाही महाराष्ट्र राज्य परिवहन सेवा ६५०० कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. दरम्यान पगार वेळेवर न मिळाल्याने गेल्या काही दिवसांत ३० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने १९७३ साली केली. सध्या एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसेस आणि एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. मात्र ही बससेवा दिवसेंदिवस आर्थिक कचाट्यात सापडत आहे. एसटीची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. एसटीच्या दुरवस्थेमुळे एसटी बसच्या कर्मचाऱ्यांना देशातील इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी पगार मिळतो.
हे ही वाचा:
‘हे सरकार कायमचं निलंबित करण्याची वेळ आली आहे’
एसटीचे विलिनीकरण झाले तर वसुली कशी होईल?
महाराष्ट्रात लवकरच भाजपाचे सरकार
वक्फ बोर्डाशी संबंधितांवर छापेमारी होताच मलिकांचा मंदिर घोटाळ्याचा आरोप
पंजाबमध्ये सरकारी बस सेवेच्या चालक आणि वाहकाला मूळ वेतन म्हणून २५,६०० रुपये मिळतात. मात्र, महाराष्ट्रातील सरकारी बस सेवेच्या एसटीच्या चालकाला १२,०८० रुपये आणि वाहकाला ११,१८० रुपये इतके मूळ वेतन मिळते. उत्तर प्रदेश परिवहन, देशातील मागास राज्यांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेशच्या सरकारी बस सेवेच्या चालकांनाही एसटीपेक्षा जास्त पगार मिळतो. उत्तर प्रदेशात चालक आणि वाहकाला १९,९०० रुपये इतका पगार मिळतो.
पंजाब, हिमाचल, हरियाणा, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सरकारी बस सेवेला सर्वात कमी पगार मिळतो, असे माजी राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य सदाभाऊ खोत यांनी सांगितले. एवढ्या कमी पगारात हे कर्मचारी कसे जगले असते, असा सवाल खोत यांनी केला आहे.