६१ दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

६१ दिवसांनंतर सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद

जीवघेण्या कोरोना विषाणूनं बराच काळ संपूर्ण जगाची पाठ सोडलेली नाही. विकसीत देशांपासून ते अगदी विकसनशील देशांपर्यंत सर्वत्रच कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. भारतातही चित्र वेगळं नाही. मागील बऱ्याच दिवसांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातल्याचं पाहायला मिळत होतं. पण, आता मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट ही धीम्या गतीनं का असेना पण ओसरत असल्याचं दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये देशात १ लाख ६३६ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, २४२७ नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. इतकंच नव्हे तर, १ लाख ७४ हजार ३९९ कोरोनाबाधितांनी या विषाणूच्या संसर्गावर मात केली.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील २४ तासांत निदान झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा मागील ६१ दिवसांमधील सर्वात कमी असल्याचं कळत आहे. यापूर्वी ७ एप्रिलला इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली होती. देशातील दैनंदिन पॉझिटीव्हीटी रेट आता ६.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

हे ही वाचा:

चीनचा प्रश्न सोडवायला नरेंद्र मोदी सक्षम

भारताची लसीकरणात इतर देशांच्या तुलनेने भरारीच!

भारत, अमेरिका, चीनला मिळाल्या ६० टक्के लसमात्रा

नायजेरियाची ट्विटर बंदी, ‘कू’ साठी संधी

देशात लसींच्या तुटवड्यामुळं काहीसं  थंडावलेलं लसीकरण पुन्हा एकदा अंशत: वेगानं सुरु झालं आहे. मागील २४ तासांत १३ लाख ९० हजार ९१६ लसी देण्यात आल्या. ज्यामुळं एकूण लसीकरणाचा आकडा २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचला आहे. आयसीएमआरच्या माहितीनुसार रविवारच्या दिवसभरात देशात १५ लाख ८७ हजार ५८९ नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवण्यात आले.

Exit mobile version