४४ दिवसांमधील सर्वात कमी रुग्ण

४४ दिवसांमधील सर्वात कमी रुग्ण

देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल २५ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात १ लाख ८६ हजार ३६४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ४४ दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या निचांकी आकड्यांवर गेली आहे. कालच्या दिवसात ३ हजार ६६० कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.

गेल्या २४ तासात भारतात १ लाख ८६ हजार ३६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ६६० रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ५९ हजार ४५९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २ कोटी ७५ लाख ५५ हजार ४५७ वर गेला आहे. देशात २ कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख १८ हजार ८९५ रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर २३ लाख ४३ हजार १५२ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

हे ही वाचा:

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले

टाळेबंदीमुळे वाहनचालक-मालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या २० कोटी ५७ लाख २० हजार ६६० इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version