उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव तरीही ‘हे’ पदक केलं निश्चित

उपांत्य फेरीत लवलिनाचा पराभव तरीही ‘हे’ पदक केलं निश्चित

महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं इतिहास रचला आहे. सेमिफायनलमध्ये भलेही तिचा पराभव झाला मात्र तिनं देशासाठी पदक जिंकलं आहे. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं लवलीनाचा पराभव केला. लवलीनानं जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली होती. या विजयासह लवलीनानं इतिहास रचत भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं होतं. आज ती पदकाचं रुपांतर सुवर्ण किंवा रौप्य पदकात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र तिला पदकाचा रंग बदलण्यात यश मिळालं नाही. तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीनं या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

क्वार्टर फायनल सामन्यात भारताच्या लवलीनानं चीनी तायपे आणि माजी वर्ल्ड चॅम्पियन निएन चिन चेनला  ४-१ अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं. याआधी लवलीनानं  जर्मनीच्या अनुभवीला पराभूत केलं होतं. आता लवलीनानं आपलं पदक निश्चित केलं आहे. लवलीनानं आता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये ती पराभूत जरी झाली तरी तिला कांस्य पदक तरी मिळणार आहे. ६९ किलोग्राम गटात लवलीना भारताकडून मेडल जिंकणारी पहिली महिला खेळाडू आहे. लवलीनाकडे भारताला सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी आहे. मात्र यासाठी लवलीनाला आणखी दोन सामने जिंकावे लागणार आहेत.

हे ही वाचा:

भारताचा चीनवर ‘हार्पून’ वार

भालाफेक, कुस्तीमध्ये भारतीय खेळाडूंचा बोलबाला

इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवायला भारत सज्ज

‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार ‘खिलाडी’ कुमार! बघा ‘बेलबॉटम’ चा धमाकेदार ट्रेलर

ऑलिम्पिकच्या आधीचे काही दिवस लवलीनासाठी खूप कठिण होते. ऑलिम्पिकआधी सर्व खेळाडू ट्रेनिंगमध्ये असताना लवनीना मात्र बॉक्सिंगपासून दूर होती.  लवलीनाच्या आईची कीडनी ट्रान्सप्लांट सर्जरी या काळात झाली. ही सर्जरी झाल्यानंतर लवलीना ट्रेनिंगसाठी परतली.

Exit mobile version